Menu Close

५ पैकी ४ राज्यांत पुन्हा भाजपचीच सरशी !

  • ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल

  • पंजाब काँग्रेसमुक्त : आपची मुसंडी

  • भाजपला उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणीपूर राज्यांत स्पष्ट बहुमत

  • गोवा राज्यात भाजप बहुमताच्या समीप

नवी देहली – देशातील ५ राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी मतमोजणीनंतर लागला. यात उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि मणीपूर या राज्यांत भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरला, तर गोव्यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. येथेही अपक्ष किंवा अन्य पक्षांच्या साहाय्याने पुन्हा सत्ता स्थापन करण्याचे सुतोवाच भाजपकडून करण्यात आले आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला धक्का बसला असून येथे आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे देहलीनंतर पंजाबमध्ये प्रथमच आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे.

उत्तराखंड

एकूण जागा ७०
बहुमत ३६
पक्ष आघाडी
भाजप ४७
काँग्रेस १९
बसप
इतर

पंजाब

एकूण जागा ११७
बहुमत ५९
एकूण जागा काँग्रेस आप शिरोमणीअकाली दल भाजप इतर
११७ १८ ९२

उत्तरप्रदेश

एकूण जागा ४०३
बहुमत २०२
पक्ष आघाडी
भाजप २७०
समाजवादी पक्ष १२८
बहुजन समाज पक्ष
काँग्रेस
इतर

मणीपूर

एकूण जागा ६०
बहुमत ३१
पक्ष आघाडी
भाजप ३२
काँग्रेस
एन्पीएफ्
एन्पीपी
इतर ११

गोवा

एकूण  जागा ४०
बहुमत २१
पक्ष आघाडी
भाजप २०
काँग्रेस ११
मगोप
आप
इतर

(टीप : मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालू असल्याने वरील आकडेवारीत पालट होऊ शकतो, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

जनतेचा राष्ट्रवादाला कौल ! – योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशमध्ये घसघशीत यश मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत पक्ष कार्यालयाच्या समोर विजय साजरा केला. या वेळी जल्लोष करणार्‍या कार्यकर्त्यांनी भगव्या रंगाची उधळण केली. त्या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘चारही राज्यांत जनतेने घराणेशाही आणि जातीयवाद यांना नाकारले आहे. चारही राज्यांमध्ये केलेला विकास आणि अनुशासन याला जनतेने आशीर्वाद दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व असेल, तर बहुमत मिळते. उत्तरप्रदेशात जनतेने राष्ट्रवाद, सुरक्षा, विकास आणि सुशासन यांना कौल दिला आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष होते. पंतप्रधान मोदी कोरोना आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात लढत असतांना काही लोकांनी याविरोधात भ्रामक प्रचार केला. ‘इलेक्ट्रॉनिक’ मतदानयंत्रांमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप केला. या चुकीच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करत जनतेने भाजपला निवडून दिले. मी जनतेचे आभार मानतो.’ या विजयोत्सवाची सांगता जय श्रीरामाच्या घोषणेने झाली. ‘उत्तरप्रदेशातील विजय हा धर्माचा अधर्मावरील विजय आहे’, अशी प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे.

गोव्यात १२ पैकी ९ पक्षबदलू उमेदवार पराभूत !

पक्षबदलूंना जनता धडा शिकवते, हे राजकीय पक्षांना लक्षात येईल तो सुदिन ! – संपादक

वर्ष २०१९ मध्ये काँग्रेसशी बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केलेले बाबू आजगावकर, दीपक पाऊसकर, चंद्रकांत कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिग्स, फ्रान्सिस्को सिल्वेरा, क्लाफासियो डायस, इजिदोर फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा आणि टोनी फर्नांडिस हे निवडणुकीत पराभूत झाले, तर आतानासियो मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात आणि नीळकंठ हळर्णकर हे ३ उमेदवार विजयी झाले. (यावरून जनतेच्या दरबारात पक्षबदलूंना शिक्षा होते, असे यावरून दिसून येते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *