मुंबई – ‘सोनी टी.व्ही.’ या वाहिनीवर असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’ या मनोरंजनाच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीत नवीन चित्रपटांचे विज्ञापनपर कार्यक्रम (प्रमोशन) केले जातात. ‘द काश्मीर फाइल्स’ या काश्मीरमधील हिंदूंवर आतंकवाद्यांनी केलेल्या अनन्वित अत्याचारांवर आधारित चित्रपटाला या कार्यक्रमांत प्रसिद्धी देण्यास नकार दिला. त्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. चित्रपट ११ मार्च २०२२ या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
याविषयी अग्निहोत्री यांनी पुढील ट्वीट केले. ‘चित्रपटसृष्टीमधील मोठे सेलिब्रेटी किंवा कलाकार यांच्याव्यतिरिक्त इतर लेखक, चांगले अभिनेते यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे या ‘शो’मध्ये कुणाला निमंत्रित करावे, मी ठरवू शकत नाही. एकदा मिस्टर बच्चन गांधी कुटुंबासाठी म्हणाले होते – ‘वो राजा हैं हम रंक’ (ते राजा आहेत आणि आम्ही भिकारी)’ असे ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करून अप्रत्यक्षरित्या ‘राजकर्त्यांचा चित्रपटसृष्टीवर अधिक प्रभाव असतो’, हे सुचवले होते.
त्यानंतर सामाजिक माध्यमातून कपिल शर्मा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ‘हे सत्य नाही’, असे म्हणत कपिल शर्मा यांनी स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळून लावले आहेत.
यातील काही टीका पुढीलप्रमाणे आहेत.
१. ‘द काश्मीर फाइल्स’ ‘प्रमोट’ करण्यास (प्रसिद्धी देण्यास) का घाबरला कपिल ? कशाची भीती वाटली ? मी तुमचा पुष्कळ मोठा चाहता होतो; पण तुम्ही तर मला आणि कोट्यवधी लोकांना निराश केले आहे. मी तुमच्यावर बहिष्कार टाकत आहे !
२. ‘कपिल शर्माच्या शो’मध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करणे आवश्यक आहे.