होळी आणि रंगपंचमी या उत्सवांमध्ये होणार्या अपप्रकारांना आळा घाला ! March 13, 2022 Share On : हिंदु जनजागृती समितीची अमरावती आणि मोर्शी येथे पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ! पोलीस निरीक्षक मोहन दळे यांना निवेदन देतांना कार्यकर्ते अमरावती – होळी आणि रंगपंचमी या उत्सवांच्या वेळी होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यात यावा. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त कार्यालय, तसेच मोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन दळे अन् तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले. मोर्शीचे पोलीस निरीक्षक मोहन दळे म्हणाले, ‘‘तुम्ही हे समाजप्रबोधानाचे पुष्कळ चांगले कार्य करत आहेत. समाजात होळी आणि रंगपचंमी यांनिमित्त होणार्या अपप्रकारांविषयी अधिकाधिक प्रबोधन करा.’’ निवेदनात म्हटले आहे की, १. होळी हा दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचार नष्ट करण्याचा उत्सव आहे; मात्र सध्या या उत्सवांत अनेक अपप्रकारांनी शिरकाव केला आहे. मद्यपान करणे, महिलांकडे बघून अश्लील अंगविक्षेप करणे, रंगपंचमीच्या दिवशी घातक रंगांचा वापर करणे आदी अपप्रकार केले जातात. यामुळे महिला, वृद्ध नागरिक, लहान मुले यांना घराबाहेर पडणे कठीण बनले आहे. २. या उत्सवांचे पावित्र्य राखणे, महिलांना सुरक्षित वाटावे, तसेच रासायनिक रंगांची विक्री होऊ नये, यांसाठी पोलिसांनी गस्तीपथके कार्यरत ठेवावीत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या काळात अशी कृत्ये करणार्यांना त्वरित कह्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यांसह प्रबोधनपर हस्तपत्रकांचे वितरण करणे, सामाजिक संस्थांच्या साहाय्याने प्रबोधन चळवळ राबवणे आदी जनजागृतीपर उपाययोजना कराव्यात. ३. कचर्याची होळी यांसारख्या पर्यावरणास घातक असलेल्या संकल्पना राबवल्या जाऊ नयेत, तसेच चांगल्या वृक्षांच्या फांद्या न तोडता धर्मशास्त्र समजून होळी साजरी करावी. Tags : Hindu Janajagruti Samitiअपप्रकारहिंदु जनजागृती समितीकडून निवेदनRelated Newsहिंदु जनजागृती समितीकडून कुंभनगरीत हिंदु राष्ट्राच्या फलकांद्वारे प्रसार January 19, 2025‘कुंभमेळा अंधश्रद्धा आहे’, असे म्हणण्यामागे नास्तिकवाद्यांचे षड्यंत्र – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती January 18, 2025गुन्हेगारी रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकला – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती January 18, 2025 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
‘कुंभमेळा अंधश्रद्धा आहे’, असे म्हणण्यामागे नास्तिकवाद्यांचे षड्यंत्र – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती January 18, 2025
गुन्हेगारी रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकला – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती January 18, 2025