Menu Close

मुसलमान तरुणाने ‘हिंदु’ असल्याचे सांगून हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे केले लैंगिक शोषण !

लैंगिक शोषणाचे चित्रीकरण करून व्हिडिओ प्रसारित

अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

रामगड (झारखंड) – येथील कुंदरुकला गावामध्ये रहणार्‍या हसनैन अंसारी याने ‘अमन महतो’ असे हिंदु नाव धारण करून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अंसारी याचा शोध घेत आहेत. अंसारी याने या मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमातून प्रसारितही केला होता. हिंदु असल्याचे भासवण्यासाठी अंसारी कपाळावर टिळा लावण्यासह मनगटावर लाल दोराही बांधत होता.

पीडित मुलीने सांगितले की, तो नेहमीच देवाची शपथ घ्यायचा. हिंदूंच्या उपाहारगृहामध्ये न्यायचा. एकदा त्याने मला खाण्यामधून गुंगीचे औषध दिले आणि नंतर माझे लैंगिक शोषण केले. या घटनेचे त्याने चित्रीकरण केले आणि त्याद्वारे तो मला धमकावत होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *