Menu Close

डुमरियागंज (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्या उमेदवार सैय्यदा खातून यांच्या विजयाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

  • भाजपच्या उमेदाराच्या विरोधात शिवीगाळ !

  • पोलिसांकडून गुन्हा नोंद  

अशा देशद्रोह्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

उजवीकडे सैय्यदा खातून

सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) – येथील डुमरियागंज मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार सैय्यदा खातून यांचा विजय झाल्यानंतर जमावाकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘इस्लाम झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या व्हिडिओची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सौजन्य न्यूज समयतक

याच मतदारसंघातील अन्य एक व्हिडिओही समोर आला आहे. यात समाजवादी पक्षाची टोपी घातलेले काही लोक दिसत असून ते येथील भाजपचे उमेदवार राघवेंद्र सिंह यांना आईवरून शिवीगाळ करत असल्याचे ऐकू येत आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *