मुंबईतील मुसलमानबहुल भिवंडीतील चित्रपटगृहात धर्मांध पात्राच्या संवादाच्या वेळी आवाज बंद करण्याचा प्रयत्न !
देशात मुसलमानबहुल भागांत अशा घटना घडत असतील, तर पोलिसांनी तात्काळ अशांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
चंडीगड – हरियाणा सरकारने ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त केला आहे. या चित्रपटामध्ये वर्ष १९८९ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या अमानुष वंशसंहाराविषयीचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट देशभरातील ५५० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने अडीच ते ३ कोटी रुपयांचा उत्पन्न मिळवल्याचे सांगितले जात आहे. लोकांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
#Haryana government declares #TheKashmirFiles tax-freehttps://t.co/I8hlDUhkkQ
— Zee News English (@ZeeNewsEnglish) March 11, 2022
१. भिवंडी येथील ‘पीव्हीआर्’ या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित केला जात असतांना यातील काही प्रसंगांच्या वेळी आवाज बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील धर्मांधाची भूमिका असणार्या पात्राचा आवाज जाणीवपूर्वक बंद करण्यात आला. त्यामुळे प्रक्षेकांनी यास विरोध केला. भिवंडी हा महाराष्ट्रातील मुसलमानबहुल भाग आहे.
२. मेघालयची राजधानी शिलाँग येथील एका चित्रपटगृहामध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नाही. ‘या चित्रपटाची रिळ न मिळाल्याने चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नाही’, असे सदर चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाकडून प्रक्षेकांना सांगण्यात आले.