Menu Close

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ प्रदर्शित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचे चित्रपटगृहांना निवेदन : हिंदुत्वनिष्ठांच्या रेट्यामुळे चित्रपट प्रदर्शित !

चित्रपट लागला नाही, हे लक्षात येताच पुढाकार घेऊन सर्व हिंदुत्वनिष्ठांना एकत्र करणार्‍या ‘हिंदवी स्वराज्य समूह गटा’चे आणि निवेदन देयासाठी सहभागी सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! हिंदूंनी जागृत होऊन आवाज उठल्यास यश मिळते त्याचे हे उदाहरण आहे !

ईश्वरपूर येथे चित्रपट गृहमालकांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च या दिवशी देशभरात प्रदर्शित झाला; मात्र तो ईश्वरपूर येथील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला नव्हता. तरी हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी बत्तीस शिराळा येथील ‘हिंदवी स्वराज्य समूह गटा’ने पुढाकार घेऊन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र करून ईश्वरपूर येथे येऊन ‘श्री माणकेश्वर चित्रमंदिर’ आणि ‘श्री शिवपार्वती चित्रमंदिर’ यांना १२ मार्च या दिवशी निवेदन दिले. याचसमवेत ‘जय हिंद चित्रमंदिर’ यांना दूरभाषद्वारे चित्रपट लावण्याविषयी मागणी केली. अखेर हिंदुत्वनिष्ठांच्या रेट्यामुळे सर्व चित्रपटगृह व्यवस्थापकांना याची नोंद घेऊन १३ मार्च या दिवशीपासून हा चित्रपट ईश्वरपूर येथे प्रदर्शित करणे भाग पडले. (हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविषयीचे सत्य मांडण्याविषयी चित्रपट प्रदर्शित करा, असे निवेदन का द्यावे लागते ? चित्रपटगृहमालकांना स्वत:हून तो चित्रपट प्रदर्शित करावा असे का वाटत नाही ? यातून हिंदूंवरील अन्याय कशा प्रकारे समाजमाध्यमांकडून दाबून टाकण्यात येतात याचे हे उदाहरण ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

ईश्वरपूर येथे चित्रपट गृहमालकांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

या वेळी ‘हिंदवी स्वराज्य समुहा’चे अध्यक्ष श्री. शिवकुमार (सनी) आवटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. शुभम् देशमुख आणि श्री. दर्शन जोशी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री गजानन पाटील, रोहन म्हेत्रे, अविनाश जाधव यांसह ५० हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *