लोणी (उत्तरप्रदेश) येथील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांची सरकारी अधिकार्यांना चेतावणी
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – अनुमतीखेरीज लोणी येथे एकही मांसविक्रीचे दुकान आणि उपाहारगृह दिसता काम नये; कारण येथे रामराज्य आहे, अशी चेतावणी लोणी येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी सरकारी अधिकार्यांना दिली.
लोनी से दोबारा विधायक चुने गए हैं नंदकिशोर गुर्जर https://t.co/Xo2gFaXRay
— AajTak (@aajtak) March 12, 2022
१. आमदार गुर्जर पुढे म्हणाले की, अमली पदार्थांचा धंदा आणि अपप्रकार होऊ नयेत, तसेच लोकांना अभिमान वाटावा, अशी कायदा आणि सुव्यवस्था असावी. गेल्या ५ वर्षांत कायदा आणि सुव्यवस्था जशी होती तशीच राहिली पाहिजे. काही अधिकारी अपकीर्ती करण्याचे काम करतात, त्यांनी सावध रहावे, अशीही चेतावणी त्यांनी दिली.
२. लोणीतील भूमाफियांवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह ‘लोणीमध्ये रामराज्य हवे आहे. त्यामुळे दूध, तूप खा आणि दंडबैठका मारा’. असेही ते म्हणाले.