Menu Close

कोपरगाव (जिल्हा नाशिक) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट अखेर प्रदर्शित होणार !

हिंदुत्वनिष्ठांच्या एकीचे आणि दबावाचे फलित !

कोपरगाव (जिल्हा नाशिक) – येथे काश्मीरमधील हिंदूंच्या अत्याचारांवर आधारित द कश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला जात नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘सुदेश पिक्चर पॅलेस’ या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे याविषयी जोरदार मागणी करून हा चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे. येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना, धर्मवीर श्याम चव्हाण प्रतिष्ठान, स्वामी विवेकानंद तरुण मंडळ यांनीही व्यवस्थापकांना या संदर्भात निवेदन दिले. कोपरगाव येथे हा चित्रपट दाखवला जात नसल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारपासून म्हणजे १८ मार्चपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘आमच्या वितरकाकडे हा चित्रपट नाही’, असे कारण आरंभी व्यवस्थापकांनी हिंदुत्वनिष्ठांना दिले होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *