Menu Close

उज्जैन सिंहस्थस्थळी वादळी पावसामुळे अनेक मांडव कोसळून १ साधू आणि ५ भाविक यांचा मृत्यू !

सिंहस्थ प्रशासनाने वादळ आणि पाऊस यांच्या दृष्टीने काहीच काळजी घेतली नसल्याचे उघड !

१३५ हून अधिक घायाळ

चांडाळ योगामुळे आपत्ती आल्याची काही साधू-संतांची प्रतिक्रिया

simhastha_damage_1

simhastha_damage_2
इतर संप्रदायांचे मांडव कोसळून मोठ्या प्रमाणात झालेली हानी

उज्जैन : ५ मेच्या दुपारी ४.३० वाजता अकस्मात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील मंगलनाथ भागात असलेल्या सिंहस्थ मेळा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात एक साधू आणि ४ भाविक मृत्यूमुखी पडले, तर १३५ हून अधिक भाविक घायाळ झाले. एक घंट्याहून अधिक वेळ झालेल्या पावसात साधु-संतांचे अनेक तंबू कोसळले.

१. जूना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक महंत हरिगिरीजी आणि आखाडाप्रमुख महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे.

२. उज्जैनचे पालकमंत्री भूपेंद्र सिंह यांनी या घटनेविषयी म्हटले आहे की, वादळात पडलेले तंबू साधू-संतांनी बनवले होते. सिंहस्थ प्रशासनाने प्रत्येक तंबूचे परीक्षण केले होते; परंतु आता आम्ही तंबूंची पुन: एकदा तपासणी करणार आहोत. (असे दायित्वशून्य काम करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. सिंहस्थक्षेत्र कच्च्या जमिनीवर बांधण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे म्हटले जात आहे.

४. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेळा प्रशासनाने वादळ आणि पावसाच्या दृष्टीने काहीच काळजी घेतली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली.

५. झी मध्यप्रदेश-छत्तीसगड या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनमध्ये सध्या १३ आखाड्यांचे साधू-संत आणि अनुयायी असून ६०-७० देशांतील भाविक या सिंहस्थासाठी आले आहेत.

६. सिंहस्थासाठी एकूण १० लाख भाविक शहरात असून ६ मे या दिवशी अमावास्या असल्याने २५ लाख भाविक पवित्र स्नानासाठी येणार आहेत. तर ९ मे ला दुसरे राजयोगी स्नानासाठी ५ कोटी भाविक उज्जैनमध्ये येणार आहेत.

७. ही घटना चांडाळ योगामुळे झाली असावी, अशी प्रतिक्रिया काही साधू-संतांनी व्यक्त केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *