आगरा (उत्तरप्रदेश) – येथील मॉल मार्गावरील अँथनी गर्ल्स स्कूलने नोटीस देऊनही अवैध बांधकाम न हटवल्याने ‘कॅन्टोन्मेंट बोर्डा’च्या पथकाने शाळेच्या आवारातील सायकल स्टँड, व्यासपीठ आणि गार्ड रुम यांचे बांधकाम बुलडोझरद्वारे पाडले. शाळा व्यवस्थापनाने मात्र हे अवैध बांधकाम पाडण्यास विरोध दर्शवला. ‘एकीकडे सरकार ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’च्या गप्पा मारते, तर दुसरीकडे त्याच सरकारचे कर्मचारी शाळा पाडण्याचे काम करत आहेत’, असे शिक्षकांनी म्हटले आहे. (हा युक्तीवाद म्हणजे वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न होय ! मुलींना शिक्षण देण्यासाठी अवैध बांधकाम केले पाहिजे, असे सरकारने कुठेही म्हटलेले नाही; मात्र कॉन्व्हेंट शाळा अशा प्रकारचे नियमबाह्य काम करून एक प्रकारे शाळेला कलंक लावत आहेत, हे त्यांच्या लक्षात का येत नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
सौजन्य टाईम्स ऑफ इंडिया