Menu Close

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री

मुंबई – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. एखाद्याच्या जिवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो. ‘एक्स’, ‘वाय’, ‘झेड’, एस्पीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.

‘वाय’ दर्जाची सुरक्षा म्हणजे  काय ?

‘वाय’ दर्जाच्या सुरक्षेत संबंधित व्यक्तीच्या रक्षणसाठी ११ सशस्त्र सैनिक तैनात केले जातात. यात २ कमांडोज्, २ पीएस्ओ असतात. देशात कुठेही गेले असता संबंधित व्यक्तीभोवती सशस्त्र कमांडोंचे सुरक्षकवच असते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *