Menu Close

(म्हणे) ‘देशभरातील काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता !’

  • ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून उमर अब्दुल्ला यांना पोटशूळ

  • ‘काश्मिरी विद्यार्थ्यांवर आक्रमण झाल्यास सरकार उत्तरदायी असेल’, अशीही गरळओक

  • काश्मीरचा ‘राष्ट्र’ म्हणून केला उल्लेख !


  • अशा वक्तव्यांद्वारे उमर अब्दुल्ला हिंदूंना आक्रमक ठरवत आहेत. उलट अब्दुल्ला करत असलेल्या विधानामुळे जर त्यांच्या धर्मबांधवांनी हातात शस्त्र घेऊन हिंदूंना लक्ष्य केले, तर त्यास अब्दुल्लाच उत्तरदायी असतील ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
  • जिहाद्यांनी काश्मिरी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची चौकशी करण्याची आणि दोषींना फासावर लटकवण्याची मागणी अब्दुल्ला करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
  • काश्मीरला ‘राष्ट्र’ संबोधून फुटीरतावादाची बीजे पेरणार्‍या अब्दुल्ला यांना केंद्रशासनाने आजन्म कारागृहात डांबले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात

‘नॅशनल कॉन्फरन्स’ पक्षाचे अध्यक्ष उमर अब्दुल्ला

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे ‘काश्मिरी राष्ट्रा’विषयी द्वेष पसरवला गेला असून देशभरातील काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे, अशी भीती ‘नॅशनल कॉन्फरन्स’ पक्षाचे अध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. जर भारतातील कोणत्याही राज्यामध्ये कुणा काश्मिरी विद्यार्थ्यावर आक्रमण झाले, तर केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार यांना त्याचे दायित्व घ्यावे लागेल, असेही अब्दुल्ला म्हणाले. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून पुष्कळ असत्य पसरवले जात आहे, असा आरोपही अब्दुल्ला यांनी केला आहे. (असत्य आरोप करणारे अब्दुल्ला ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *