Menu Close

होळीच्या पूर्वसंध्येला बांगलादेशमध्ये २०० हून अधिक धर्मांधांकडून इस्कॉनच्या मंदिरांची तोडफोड

पोलिसांना घटनेची माहिती देऊनही पोलीस निष्क्रीय !

  • बांगलादेश, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत हिंदूंची ही स्थिती काल, आज आणि उद्याही रहाणार आहे. ही स्थिती पालटणेही तेथील हिंदूंना शक्य नाही. त्यासाठी भारतानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच होऊ शकते, हे सत्य आहे ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात
  • भारतातही धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्यावर पोलीस निष्क्रीय रहातात, तेथे मुसलमानबहुल बांगलादेशातील पोलीस निष्क्रीय रहात असतील, तर त्यात आश्‍चर्य काय ? – संपादक  दैनिक सनातन प्रभात

ढाका (बांगलादेश) – होळीच्या पूर्वसंध्येला येथील ‘२२२ लाल मोहन साहा मार्गा’वरील इस्कॉनच्या राधाकांत मंदिरावर २०० हून अधिक धर्मांधांनी ‘अल्ला हु अकबर’ (अकबर महान आहे) आणि ‘नारा-ए-तकदीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे) अशा घोषणा देत आक्रमण करून त्याची तोडफोड केली. यासह मंदिरातील मौल्यवान साहित्याचीच लूट केली. या आक्रमणात काही हिंदू घायाळ झाले. यात सुमंत्र चंद्र श्रवण, निहार हलदर, राजीव भद्र आदींचा समावेश आहे. ही घटना १७ मार्चला सायंकाळी ७ वाजता घडली. धर्मांधांच्या जमावाचे नेतृत्व हाजी शफीउल्ला याने केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. येथे सध्या तणावाची स्थिती आहे. त्यामुळे मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली; मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून हिंदूंनाच मारहाण !

याविषयी आक्रमणात घायाळ झालेले निहाल हलदर यांनी सांगितले की, या आक्रमणाचे मुख्य सूत्राधार महंमद इसराफ सूफी (वय ३१ वर्षे) आणि हाजी सफीउल्लाह (वय ६२ वर्षे) हे आहेत. धर्मांधांच्या हातात लाठ्या, लोखंडी सळ्या आणि अन्य शस्त्रे होते. आक्रमण केल्यानंतर भाविकांनी मंदिराचे मुख्य द्वार बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांना बोलावले; मात्र पोलीस आल्यानंतर त्यांनी निहाल हलदर यांनाच मारहाण करून त्यांचा दूरभाष हिरावून घेतला. आक्रमणातून ५ लाख रुपये लुटण्यात आले.

‘इस्कॉन इंडिया’कडून घटनेचा निषेध !

‘इस्कॉन इंडिया’चे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी ट्वीट करून या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, डोल यात्रा आणि होळी यांच्या उत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेली ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच, संयुक्त राष्ट्रांनी १५ मार्च हा ‘इस्लामोफोबिया’शी (इस्लामद्वेषाशी) लढा देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित करण्याचा ठराव संमत केला होता. आम्हाला आश्‍चर्य वाटते की, सहस्रो असाहाय्य बांगलादेशी आणि पाकिस्तानी अल्पसंख्यांकांच्या दुःखावर तेच संयुक्त राष्ट्र मूक आहे. त्यामुळे अनेक हिंदु अल्पसंख्यांकांनी त्यांचे प्राण गमावले, संपत्ती गमावली, हिंदु महिलांवर बलात्कार झाले; पण संयुक्त ‘राष्ट्रे इस्लामोफोबिया’वर विचार करत आहे.

बांगलादेशात यापूर्वीही झाले आहेत मंदिरांवर आणि हिंदूंवर आक्रमणे !

याआधीही धर्मांधांकडून बांगलादेशात मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर मासात नवरात्रोत्सवाच्या वेळी देशभरात हिंदूंवर आणि मंदिरांवर आक्रमणे झाली होती. चौमुनी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधाकृष्ण गौरा नित्यानंद मंदिरावरही धर्मांधांनी आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. यात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली होती. यासमवेतच इतर अनेक शहरांमध्ये मंदिरांवरही आक्रमणे झाली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *