|
बरेली (उत्तरप्रदेश) – धूलिवंदनाच्या दिवशी येथील बहेडी पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्या एका मशिदीवर गुलाल उडाल्याच्या रागातून धर्मांधांकडून येथे होळी साजरी करणार्या काही हिंदूंना मारहाण करण्यात आली. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्यांनाही विरोध करण्यात आला. या घटनेनंतर धर्मांधांनी येथील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला, तसेच या प्रकरणी गुन्हा नोंद केला. या घटनेमुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
येथील समाजवादी पक्षाचे आमदार अताउर्रहमान यांनी आरोप करतांना म्हटले, ‘होळी साजरी करणार्याने मशिदीचे संरक्षक अब्दुल वाहिद यांना रंग लावला. वाहिद यांनी येथे होळी साजरी न करण्याविषयी सांगूनही ती तेथे साजरी करण्यात आली.’