Menu Close

‘द कश्मीर फाइल्स’वरून कोलकाता येथील चित्रपटगृहामध्ये धर्मांधांचा गदारोळ !

धर्मबांधवांचे क्रौर्य जगासमोर येऊ नये, यासाठी खटाटोप करणारे धर्मांध ! अशांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे आवश्यक !

कोलकाता (बंगाल) – येथील एका चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चालू असतांना धर्मांधांनी गदारोळ केला. त्यामुळे चित्रपटाचे प्रसारण ३० मिनिटांपर्यंत थांबवण्यात आले. ‘या धर्मांधांना नंतर चित्रपटगृहातून बाहेर काढण्यात आले’, अशी ट्वीट ‘इंडिया टीव्ही’चे पत्रकार मनीष भट्टाचार्य यांनी केली.

धर्मांधांनी शहरातील ‘नवीना सिनेमा हॉल’ येथे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे प्रसारण बलपूर्वक बंद पाडले. त्यांनी घोषणा देत ‘द कश्मीर फाइल्स’वर बंदी घालण्याची मागणी केली. हिंदूंनी त्यांचा प्रतिकार केला. या वेळी चित्रपटगृहाच्या कर्मचार्‍यांनी धर्मांधांना बाहेर काढले. त्यानंतर चित्रपटाचे प्रसारण पुन्हा चालू करण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *