Menu Close

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये रहाण्याचा पूर्ण अधिकार मिळणे आवश्यक असल्याचेही मत व्यक्त

लेखिका तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा चित्रपट आजतागायक कुणी का बनवला नाही, असा प्रश्‍न बांगलादेशी लेखिता तस्लिमा नसरीन यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थित केला.

याविषयी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये रहाण्याचा पूर्ण अधिकार मिळणे आवश्यक असल्याचेही मत व्यक्त केले. ‘या चित्रपटात दाखवलेल्या घटना जर सत्य असतील, त्यात काहीही अतिशयोक्ती नसेल, तसेच कुठलीही गोष्ट अर्धसत्य नसेल, तर काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात घडलेली ही घटना अत्यंत दुःखद आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. (काश्मिरी हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांविषयी शंका उपस्थित करणार्‍या तस्लिमा नसरीन यांनी आधी पूर्ण इतिहास जाणून घेऊन मत व्यक्त करावे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर असा अविश्‍वास व्यक्त करणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *