Menu Close

(म्हणे) ‘चित्रपट निर्मात्याने मुसलमानांच्या हत्याकांडावरही चित्रपट बनवावा !’

मध्यप्रदेशचे आय.ए.एस्. अधिकारी नियाज खान यांचा कांगावा

  • धर्मांध आणि जिहादी यांचा क्रौर्य जगासमोर आणल्यावर त्यांच्या धर्मबांधवांना मग ते कितीही शिकलेले असोत पोटशूळ उठतोच, याचे हे उदाहरण ! असे प्रशासकीय अधिकारी पीडित हिंदूंना काय न्याय देणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • मुसलमानांवर कथित अन्याय झाल्यावर साम्यवादी, निधर्मीवादी, बुद्धीजिवी असे सर्वच हिंदूंवर तुटून पडतात; मात्र धर्मांधांनी कुकृत्ये केल्यावर ती झाकून ठेवली जातात, हे सत्य खान यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

आय.ए.एस्. अधिकारी नियाज खान (डावीकडे)

भोपाळ – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असतांना धर्मांध आणि हिंदुद्वेष्टे यांच्याकडून विरोधही केला जात आहे. मध्यप्रदेशमधील ‘आय.ए.एस्.’ (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी नियाज खान यांनी विवेक अग्निहोत्री यांचे नाव न घेता ‘चित्रपट निर्मात्याने मुसलमानांच्या हत्याकांडावरही चित्रपट बनवावा. ते कीटक नसून मानव आहेत’, असे म्हटले आहे. (भारतातील पीडित हिंदूही स्वातंत्र्यानंतर ओरडून ‘आम्ही कीटक नसून मानव आहोत’, हे सांगत आहेत; मात्र त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

१. नियाज खान यांनी समाज माध्यमातून सांगितले, ‘वेगवेगळ्या प्रसंगी मुसलमानांचे झालेले हत्याकांड दाखवण्यासाठी पुस्तक लिहिण्याचा मी विचार करत आहे जेणेकरून ‘द कश्मीर फाइल्स सारखा चित्रपट कुठल्यातरी निर्मात्याला बनवता येईल आणि अल्पसंख्यांकांच्या वेदना भारतियांसमोर आणता येतील.

२. नियाज खान हे मध्यप्रदेश कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. सध्या ते सार्वजनिक बांधकाम विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. नियाज खान यांनी आतापर्यंत ६ पुस्तके लिहिली आहेत. नियाज खान सध्या त्यांच्या धर्माची हिंसक प्रतिमा पुसून टाकण्यासाठी संशोधन करत आहेत. ‘काही संघटनांच्या प्रतिमेमुळे इस्लाम आजही अपकीर्त होत आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *