Menu Close

आदिलाबाद (तेलंगाणा) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट चालू असतांना दोघा धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

प्रेक्षकांनी दोघांचा चोपले !

अशा देशद्रोह्यांना आता फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, तरच अशा घटना कायमच्या थांबतील ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

आदिलाबाद (तेलंगाणा) – येथे एका चित्रपटगृहामध्ये १८ मार्च या दिवशी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट चालू असतांना दोघा धर्मांधांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि भारतविरोधी घोषणाबाजी करण्यास चालू केले. यामुळे संतप्त झालेल्या हिंदु प्रेक्षकांनी त्यांना चोपले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. नंतर हे दोघे तेथून पळून गेले. पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांकडे याविषयी कुणीही अधिकृत तक्रार केलेली नाही. (हे हिंदूंना लज्जास्पद ! अशा देशद्रोह्यांविषयी तक्रार करणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) ‘ही घटना शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी घडवण्यात आली’, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. (ती बिघडवणार्‍या धर्मांधांना पकडण्याचे दायित्व पोलिसांचे आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *