Menu Close

नदिया (बंगाल) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून परतणार्‍या भाजपच्या खासदाराच्या वाहनावर बाँबफेक

भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार (डावीकडे)

नदिया (बंगाल) – येथील भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी आरोप केला की, ते येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी परतत असतांना त्यांच्या वाहनावर बाँब फेकण्यात आला. वाहन वेगात असल्याचे हा बाँब गाडीच्या मागे पडल्याने आम्ही बचावलो. यात कोणतीही हानी झाली नाही.

खासदार जगन्नाथ सरकार म्हणाले की, ममता बनर्जी यांच्या सरकारमध्ये बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट आहे. येथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे. त्याखेरीज अशा घटना थांबणार नाहीत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *