Menu Close

धर्मावरील आघात रोखायचे असतील, तर हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप

सासवणे (रायगड) येथे हिंदु धर्मजागृती सभा ! 

दीपप्रज्वलनाच्या प्रसंगी डावीकडून सौ. नंदिनी सुर्वे, मध्यभागी श्री. नरेंद्र सुर्वे आणि डॉ. डहाके

सासवणे (जिल्हा रायगड) : धर्मांतर, ‘लव्ह जिहाद’, गोहत्या, पाश्‍चिमात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, इतिहासाचे विकृतीकरण, भ्रष्टाचार, आतंकवाद यांसारखे हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवरील आघात प्रभावीपणे रोखायचे असतील, तर या देशात हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही, असे उद्गार भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके यांनी काढले. ते सासवणे, रामनाथ (अलिबाग) येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते.
आधुनिक वैद्य डहाके पुढे म्हणाले की, विविध आमिषे दाखवून आणि बलपूर्वक धर्मांतर केले जाते आणि ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून आमच्या हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त केले जाते. हे सर्व पालटायचे असेल, तर सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. नंदिनी सुर्वे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन श्री. योगेश ठाकूर आणि समितीचा परिचय श्री. नितीन गावंड यांनी करून दिला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *