भोपाळ (मध्यप्रदेश) – रायसेन जिल्ह्यातील खमरिया पौडी या गावात धर्माधांनी केलेल्या आक्रमणात एका आदिवासी हिंदूचा मृत्यू झाला, तर ३८ जण घायाळ झाले. घायाळ झालेल्यांपैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रुग्णालयात जाऊन घायाळांची विचारपूस केली. त्यांनी मृत झालेल्या राजू आदिवासी यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये, तर घायाळांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, गोळीबार करणे, हा सामान्य गुन्हा नाही. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
मध्य प्रदेश के रायसेन जिले में दो समुदायों के बीच विवाद, कई घायलों की हालत गंभीरhttps://t.co/ukQ870VK2j
— AajTak (@aajtak) March 19, 2022
ही घटना दोन लहान मुलांच्या भांडणामुळे घडली. एका धर्मांध मुलाने आदिवासी मुलाला मारहाण केल्यावरून दोन्ही समुदायांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी लाठ्या-काठ्या, कुर्हाड यांचा वापर करण्यात आला, तर काही जणांनी गोळीबारही केला. येथील दुकाने, वाहने आणि घरे यांची जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली, तर २ रायफली जप्त करण्यात आल्या. या घटनेनंतर या भागात जमावबंदी लागू करण्यात आली.