Menu Close

अमरावती येथे ‘द कश्मीर फाइल्स’ पाहिल्यावर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदूंना धर्मांधांचा विरोध !

  • वादाचे हाणामारीत रूपांतर

  • १५ जणांना अटक आणि जामीन

हिंदूबहुल देशात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावर धर्मांधांना पोटशूळ उठण्याचे कारणच काय ?

अमरावती – येथील परतवाडा येथे २० मार्चच्या रात्री उशिरा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहून चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्यानंतर काही हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. घोषणा ऐकून परिसरातील धर्मांध युवक बाहेर आले. त्यांनी वाद घालण्यास प्रारंभ केला. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या वेळी अनेक जण घायाळ झाले. पोलिसांनी जमावाला पांगवले आणि १५ जणांना अटक केली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींना अचलपूर न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *