भारताने अशा विदेशी उत्पादनांवर बंदी घालावी !
आस्थापनाची टाल्कम पावडर वापरल्याने अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप आस्थापनाच्या विरोधात १२०० हून अधिक खटले !
मिसौरी (अमेरिका) : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या जागतिक आस्थापनाची टाल्कम पावडर अनेक वर्षे वापरल्यानेच आपल्याला अंडाशयाचा कर्करोग झाला, हा अमेरिकेतील दक्षिण डकोटा येथील एका महिलेचा दावा सेंट लुइस न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. मिसौरी राज्यातील या न्यायालयाने महिलेला ३६६ कोटी रुपयांची (५.५ कोटी डॉलर्सची) हानीभरपाई देण्याचे आदेशही आस्थापनाला दिले आहेत. या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय आस्थापनाने घेतला आहे.
१. अमेरिकेतील साऊथ डकोटा येथे रहाणार्या ग्लोरिया रिस्टसंड या महिलेने जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आस्थापनावर सदर खटला प्रविष्ट केला होता.
२. गेल्या ३ मासांत आस्थापनावर अशा प्रकारे दुसर्यांदा ही स्थिती ओढवली आहे. आस्थापनाची पावडर वापरल्याने अंडाशयाचा कर्करोग होऊन मरण पावलेल्या अलाबामा राज्यातील महिलेच्या नातेवाइकांना ४७९ कोटी रुपयांची (७ कोटी २० लाख डॉलर्सची) भरपाई देण्याचे आदेश सेंट लुईसच्याच न्यायालयाने फेब्रुवारी मासात दिले होते.
३. जॉन्सन अॅण्ड जॉन्सनच्या विरोधात सध्या अशा प्रकराचे १२०० खटले चालू आहेत.
४. टाल्कम पावडर वापरल्याने होणार्या कर्करोगासारख्या संभाव्य धोक्यांसंबंधी पुरेशी माहिती आस्थापनाने आपल्या उत्पादनांवर दिली नाही, असा या ग्राहक याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.
५. टाल्कम पावडरचा अंडाशयाच्या कर्करोगाशी असलेल्या संबंधावर १९७० च्या सुमारास संशोधन चालू झाले. आस्थापनालाही गेली ३० वर्षे टाल्कम पावडरच्या धोक्याची माहिती होती, असाही दावा याचिकाकर्त्यांनी केला.
६. या संदर्भात आस्थापनाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, आमच्या ३० वर्षांच्या सुरक्षाविषयक संशोधनाच्या विरोधात हा निकाल आहे. आम्ही उत्पादनांच्या निर्धोकतेचा पुरस्कार करीत राहूच ! (सहस्रो खटले चालू असूनही क्षमा मागण्याऐवजी आम्ही काही केलेलेच नाही, या आविर्भावात असलेल्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आस्थापनाला जनताच तिची योग्य जागा दाखवील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात