बदायू (उत्तरप्रदेश) येथील अल्लापूर भोगी गावातील घटना !
|
बदायू (उत्तरप्रदेश) – येथील अल्लापूर भोगी गावात होळीच्या दिवशी मोठा ‘डिजे’ (मोठी ध्वनिक्षेपक यंत्रणा) बंद करण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. या वेळी झालेल्या दगडफेकीत १ पोलीस अधिकारी आणि ९ जण घायाळ झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी सरपंचा बेगम जैनब यांच्या तक्रारीनंतर १७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. पोलिसांकडून हिंदूंवरच कारवाई होत असल्याने गावातून ३० हिंदु कुटुंबियांनी पलायन केले आहे.
१. होळीच्या दिवशीच शब-ए-बारात हा मुसलमानांचा सण होता. दुपारी होळीच्या वेळी हिंदू ‘डिजे’ लावून सण साजरा करत होते. या वेळी मुसलमान कब्रस्तानात जात असतांना त्यांनी ‘डिजे’ बंद करण्यास सांगितले. त्यास हिंदूंनी नकार दिल्यावर त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
२. सरपंचा जैनब यांचे पती रिझवान यांनी आरोप केला की, माजी सरपंच वली महंमद याने हिंदूंना भडकावल्याने हिंसाचार झाला. पोलिसांनी वली महंमदसह १७ जणांना अटक केली.
३. हिंदूंचा आरोप आहे की, रिझवान, गुड्डू आदी १५० धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करूनही त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही. पोलीस हिंदूंचा छळ करत आहेत. यामुळेच हिंदू येथून पलायन करत आहेत.
४. पोलीस उपअधीक्षक ओ.पी. सिंह म्हणाले की, जर हिंदूंच्या पलायनाचे वृत्त खरे असेल, तर त्यांना संरक्षण देण्यात येईल. (हिंदूंचे पलायन होत आहे कि नाही, हे पोलिसांनाच ठाऊक नसेल की, तर ते पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक : दैनिक सनातन प्रभात)