Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आग्रा (उत्तरप्रदेश) येथील हृदयरोगतज्ञ डॉ. राजकुमार गुप्ता यांची घेतली भेट !

उजवीकडे हृदयरोगतज्ञ डॉ. राजकुमार गुप्ता आणि (मध्यभागी) त्यांची पत्नी सौ. सुमन गुप्ता यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’ भेट देतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आग्रा (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान चालू आहे. या अंतर्गत समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आग्रा येथील हृदयरोगतज्ञ डॉ. राजकुमार गुप्ता आणि त्यांची पत्नी सौ. सुमन गुप्ता यांची भेट घेतली.

मनाला नियंत्रणात ठेवायचे असेल, तर मुनष्याने अध्यात्माकडेच वळायला हवे ! – सद्गुरु डॉ. पिंगळे

भारताला स्वतंत्र करतांना इंग्रजांनी शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातून अर्थार्जन करणारी जनता निर्माण केली. त्यामुळे भारतातील युवा पिढी विदेशात जाऊ लागली; मात्र इंग्रजांनी हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास आणि चिंतन करून त्यातील सर्व ज्ञान आधुनिक भाषेमध्ये भाषांतर करून घेतले. ते हेही स्वीकारतात की, या ज्ञानाचा मुख्य स्रोत त्यांच्याकडे नाही, तर भारताकडे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी म्हटले आहे की, मनुष्याने त्याची बुद्धी विज्ञानाला समर्पित केल्याने विज्ञानात प्रगती झाली; परंतु मनुष्याच्या इच्छा, अपेक्षा आणि दुःखाचे कारण वाढले आहे. मनाला नियंत्रणात ठेवायचे असेल, तर अध्यात्माकडेच वळावे लागेल आणि साधना करावी लागेल.

समाजाला जागृत करून एकसंघ करण्याची योग्य वेळ आता आली आहे ! – डॉ. राजकुमार गुप्ता

तुमचे (हिंदु जनजागृती समितीचे) कार्य पुष्कळ चांगले आणि व्यापक आहे. समाजाला जागृत करून एकसंघ करण्याची योग्य वेळ आता आली आहे. मी तुमच्या समवेत आहे. सर्व आधुनिक वैद्यांचे एक व्यासपीठ बनवून हे विचार तेथे मांडण्यासह कृतीशील योजना आखल्या पाहिजेत. यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. आग्रा येथे काही कार्यक्रम करायचे असतील, तर तुम्हाला नक्की बोलावू. तेथे तुम्ही मार्गदर्शन करावे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *