मंदिर परिसरात अन्य धर्मियांनी व्यापार करावा की नाही, यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाही करावी! – संपादक दैनिक सनातन प्रभात
बेळगाव – जोपर्यंत गोहत्या करणे, गोमांस खाणे ही मुसलमान धर्मियांची मानसिकता पालटत नाही, तोपर्यंत त्यांच्यासमवेत कोणत्याही प्रकारचा व्यापार, व्यवहार करण्यात येऊ नये. सौंदत्ती, यल्लमासह सर्व मंदिरांच्या आवारात मुसलमानांना दुकाने लावण्यास अनुमती देण्यात येऊ नये. लवकरच त्यासाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी २४ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री. रविकुमार कोकीतकर आणि श्री. विनय अंग्रेळी उपस्थित होते.
१. मुसलमान दुकानदारांच्या विरोधात सौंदत्ती, पंतबाळेकुंद्री आणि श्री होळम्मादेवी मंदिर आवारात आंदोलन करण्यात येणार आहे. लवकरच सर्व मंदिरांच्या आवारात मुसलमानांना व्यापार करण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात येणार आहेत. आमची कृती कायदेशीर असून कायद्यानुसार हिंदूंच्या मंदिरांमध्ये १०० मीटर आवारात अन्य कोणत्याही धर्मियांनी व्यापार करू नये, अशी तरतूद आहे. सरकारने याची काटेकोरपणे कार्यवाही करावी.
२. उंचगाव येथे श्री मळेकरणीदेवीची प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी यात्रा होते. या यात्रेत बकर्यांचा बळी दिला जातो. यात मुसलमानांकडून बकर्यांचा बळी देणे चुकीचे आहे. याविषयीही जागृती करण्यात येणार आहे.