कर्नाटक सरकारकडून मंदिरांच्या परिसरात मुसलमानांना दुकाने थाटण्यास अनुमती नाकारण्याच्या मंदिर प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन
जर कर्नाटकमध्ये असा कायदा असेल, तर भाजपशासित प्रत्येक राज्यांत असा कायदा केला पाहिजे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारकडे मागणीही केली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील ‘कर्नाटक धार्मिक संस्थान आणि धर्मार्थ बंदोबस्ती अधिनियम २०२२’च्या नियम १२ नुसार हिंदूंच्या धार्मिक स्थळाजवळ असलेली भूमी अहिंदूंना दिली जाऊ शकत नाही. हा नियम तत्कालीन काँग्रेस सरकारकडून करण्यात आला आहे.
Non-Hindus cannot do business in and around Hindu temple premises: Karnataka govt https://t.co/9iZWxCSJ84
— TOI Bengaluru (@TOIBengaluru) March 23, 2022
जर मंदिराच्या परिसराच्या बाहेरील भूमीवर दुकान थाटण्याची अनुमती मागण्यात आली, तर एकवेळ त्यावर विचार केला जाऊ शकतो, असे सांगत कर्नाटकचे कायदामंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी राज्यातील काही मंदिरांच्या प्रशासनाकडून वार्षिक उत्सवाच्या वेळी मुसलमानांना दुकाने थाटण्यास अनुमती नाकारल्याच्या निर्णयाचे विधानसभेत समर्थन केले. काँग्रेसचे आमदार यू.टी. खादर आणि रिजवान अर्शद यांनी याविषयीचे सूत्र उपस्थित केल्यावर मधुस्वामी यांनी वरील उत्तर दिले.