Menu Close

(म्हणे) ‘चित्रपट सत्य नव्हे, तर असत्य घटनांवर आधारित !’ – अरविंद केजरीवाल

  • अरविंद केजरीवाल यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ला खोटे ठरवण्याच्या विधानावरून हिंदूंकडून तीव्र शब्दांत निषेध !

  • देहलीत चित्रपट करमुक्त करण्यास नकार !

मुसलमानांचे लांगूलचालन करणारे केजरीवाल यांच्याकडून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांकडे कानाडोळा केला जाणे किंबहुना हिंदूंचा नरसंहार नाकारणे, यात काय आश्‍चर्य ? जागृत झालेला हिंदु समाज अशा नेत्यांना कायमचे घरी बसवण्यासाठी निवडणुकांद्वारे त्यांची शक्ती दाखवेल, हे केजरीवाल यांच्यासारख्या हिंदुद्रोह्यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

डावीकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी देहली – सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या संंदर्भात मोठी चर्चा होत आहे. या चित्रपटाने नुकताच २०० कोटी रुपयांच्या कमाईचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. काही दिवसांपूर्वी देहलीतील भाजपने हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली होती. त्या मागणीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तुम्हाला चित्रपट पहायची एवढीच हौस आह आणि त्याला करमुक्त करायची इच्छा असेल, तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सांगा की, हा चित्रपट ‘यूट्यूब’वर प्रदर्शित करा ! तिथे सर्वजण हा चित्रपट फुकट पाहू शकतील ! तसाही हा चित्रपट खर्‍या घटनांवर नव्हे, तर असत्यावर आधारित  आहे’, असे संतापजनक विधान केले. या आधी केजरीवाल सरकारने ‘निल बट्टे सन्नाटा’, ‘सांड की आंख’ आणि ‘८३’ हे चित्रपट करमुक्त केले होते.

आता तर चित्रपटगृहात जाऊनच ‘द काश्मीर फाइल्स’ बघा ! – अनुपम खेर

काश्मिरी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर अभिनेते अनुपम खेर यांचे सडेतोड प्रत्युत्तर ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

केजरीवाल यांच्या विधानावर चित्रपटाचे अभिनेते अनुपम खेर यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत ट्वीट केले आहे. ते म्हणाले, ‘‘मित्रांनो, आतातर चित्रपटगृहात जाऊनच ‘द काश्मीर फाइल्स’ बघा ! तुम्हाला ३२ वर्षांनंतर काश्मिरी हिंदूंचे दु:ख कळले आहे. त्यांच्यावर झालेला अत्याचार समजून घ्या !

त्यांच्याशी सहानुभूती दाखवा, पण जे लोक या शोकांतिकेची चेष्टा करत आहेत, कृपया त्यांना तुमच्या शक्तीची जाणीव करून द्या !’ खेर यांचे हे ट्वीट सामाजिक माध्यमांवर प्रचंड ‘व्हायरल’ झाले आहे.

कोणकोणत्या चित्रपटांना केजरीवाल यांनी केले होते करमुक्त ?

वर्ष           चित्रपटाचे नाव
२०२१          ८३
२०१९         सांड की आंख
२०१६        निल बट्टे सन्नाटा

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *