Menu Close

गडकोटांवरील इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक ! – नितीन शिंदे, माजी आमदार

श्री. नितीन शिंदे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना विजय क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते

सांगली – महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक आहे. हे आक्रमण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे, असे आवाहन माजी आमदार आणि भाजपचे नेते श्री. नितीन शिंदे यांनी केले. ‘गड जिहाद’ रोखण्यासाठी भाजपच्या वतीने एक दक्षता समिती स्थापन करण्यात आली. यात माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्याविषयी भोई गल्ली, खणभाग येथील ‘विजय क्रीडा मंडळा’च्या वतीने श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री. नितीन शिंदे

श्री. निरंजन कुलकर्णी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. सौरभ सटाले, सर्वश्री सुरेश गरड, प्रदीप निकम, आशिष साळुंखे, दिग्विजय शिंदे, राहुल शिंदे, गौरव गडदे, ऋतिक शिंदे यांसह अन्य शिवभक्त उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *