Menu Close

भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जाते ! – अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे, हिंदु जनजागृती समिती

खुडी, देवगड येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !  

देवगड – आपल्या देशात निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदूंना अयोग्य वागणूक दिली जाते, तर अल्पसंख्यांकांना विशेष सवलती देण्यात येत आहेत. निधर्मीवाद सांगून हिंदूंना दुय्यम स्थान आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जाते. हिंदु धर्मपरंपरा विकृत केल्या जात आहेत. सध्या हिंदूंवर, तसेच मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. संघटित नसल्यामुळे हिंदूंची अवस्था दयनीय झाली आहे. बहुसंख्य असलेला हिंदु समाज धर्मशिक्षित नसल्याने स्वधर्माची हानी उघड्या डोळ्यांनी बघूनही शांत बसलेला आहे. धर्मांध ‘लव्ह जिहाद’, ‘थूक जिहाद’, ‘लँड जिहाद’, यांसारखे असंख्य ‘जिहाद’ करत आहेत. त्यातच आता ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेली उत्पादने बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवगड तालुक्यातील खुडी गावातील श्री देवी हेदुबाई मंदिरामध्ये २३ मार्च या दिवशी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करतांना अधिवक्त्या (सौ.) राणे पुढे म्हणाल्या, ‘‘पाश्‍चात्य संस्कृतीचा हिंदूंवरील वाढता परिणाम, हिंदूंनी स्वधर्माचे आचरण न करणे,  त्यामुळे धर्माची होणारी हानी टाळण्यासाठी ‘हिंदु’ या एका छत्रछायेखाली येणे आणि संघटित होणे महत्त्वाचे आहे. आपण अशा गावागावांमध्ये होणार्‍या सार्वजनिक (जाहीर) हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून संघटित होऊया. धर्मावर घाला घालणार्‍या शक्तींना आपण सदनशीर मार्गाने विरोध केला पाहिजे. हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर करण्यासाठी सर्व हिंदूंनी जात, पंथ, आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून हिंदु म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे.’’ या सभेचे सूत्रसंचालन श्री. आनंद मोंडकर यांनी केले. या सभेला १३० धर्माभिमानी बांधव उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर विविध विषयांवर चर्चा करतांना धर्मप्रेमी

क्षणचित्रे

१. हे धर्मकार्य असल्याची जाणीव झाल्यानंतर काही धर्माभिमानी हिंदूंनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून या सभेचा प्रचार-प्रसार केला.

२. सभेपूर्वी आजूबाजूला वादळी पाऊस पडत होता; पण मंदिराच्या भोवती मात्र पाऊस रिमझिम पडला. त्यामुळे सभेच्या पूर्वसिद्धतेमध्ये कुठेही अडथळा आला नाही.

३. सभा चालू झाल्यावर अचानक गडगडाटासह पाऊस पडू लागला, तरीही लोक शांतपणे सभा ऐकत होते.

४. सभेनंतर महिला आणि पुरुष चर्चेसाठी थांबले होते.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेला साहाय्य केलेल्यांचे आभार

१. या सभेसाठी श्री देवी हेदुबाई देवस्थान समिती, खुडी यांनी मंदिर उपलब्ध करून दिले. देवालयाचे अध्यक्ष श्री. आबा घाडी यांचेही सहकार्य लाभले.

२. श्री. बाबू मेस्त्री यांनी सभेसाठी विनामूल्य ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि जनरेटर उपलब्ध करून दिला.

३. बचतगटाच्या माध्यमातून सभेपूर्वी महिलांनी मंदिर आणि परिसर यांची स्वच्छता केली.

४. एका निवृत्त पोलीस कर्मचार्‍याने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांध यांच्याविषयी आलेले अनुभव सांगितले.

५. सभेपूर्वी अचानक वीज प्रवाह खंडित झाला. ग्रामस्थांनी त्वरित ‘जनरेटर’ची व्यवस्था केली.

अभिप्राय

१. श्री. अमोल भिवा कामतेकर – सभा खूप चांगली झाली. पुन्हा सभा कुठे असेल, तर मी नक्की येईन आणि या धर्मकार्यास वेळ देईन.

२. सौ. सविता संतोष मुणगेकर, कु. तेजस्विनी अशोक शिद्रुक आणि श्री. काशीराम भोजू गाडी – मुले आणि मुली यांच्यासाठी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करावे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *