रायगड (छत्तीसगड) – येथील तहसीलदाराने शिवमंदिरातील भगवान शंकराच्या नावाने नोटीस पाठवल्यामुळे गोंधळात पडलेल्या भाविकांनी मंदिरातील शिवलिंग उचलून ते न्यायालयात नेले. न्यायालयात उपस्थित न झाल्यास १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याची चेतावणी देण्यात आल्यामुळे भाविकांनी ही कृती केल्याचे भाविकांनी म्हटले आहे. न्यायालयात शिवलिंग आणले असता तेथे स्वतः तहसीलदारच उपस्थित नव्हते, त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणी १३ एप्रिला पुढील सुनावणी ठेवली आहे. (अशा तहसीलदारांवरच न्यायालयाने कारवाई केली पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) या मंदिरासाठी भूमीचे अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
Chhattisgarh: Shivling of a temple uprooted and carried on a hand cart to the Tehsil office to appear before a Court for a summonhttps://t.co/NGvm7TJmX8
— OpIndia.com (@OpIndia_com) March 25, 2022