सरकारने आतातरी या घटनेची सखोल चौकशी करून काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडामागील सूत्रधारांना कठोर शिक्षा करायला हवी !
मुंबई – जेव्हा काश्मिरी हिंदूंच्या हत्या झाल्या, त्याच्या दोन दिवस आधीच फारुख अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देऊन विदेशात निघून गेले. त्या वेळी जगमोहन यांच्याकडे राज्यपालपदाचे दायित्व सोपवण्यात आले. खराब हवामानाचे कारण सांगून त्यांना जम्मू येथे जाण्यापासून रोखण्यात आले आणि त्याच वेळी काश्मिरी हिंदूंवर अत्याचार करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या, अशी माहिती ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी दिली.
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात दाखवलेल्या दृश्यांसाठी मी दोषी असेन, तर मी फासावर चढायलाही सिद्ध आहे’, असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी नुकतेच केले होते. यावर बोलतांना जोशी यांनी वरील वास्तव मांडले.
आमच्याकडे ७०० जणांची विधाने आहेत !पल्लवी जोशी पुढे म्हणाल्या, ‘‘आम्ही चित्रपटात कोणतीही चुकीची गोष्ट दाखवलेली नाही. गेल्या ४ वर्षांचे संशोधन आणि काही कायदेशीर कागदपत्रे यांच्या आधारेच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. आजही आमच्याकडे ते सर्व व्हिडिओ आणि संशोधन उपलब्ध आहे. त्यात सरकारी कर्मचार्यांपासून ते प्रशासकीय अधिकार्यांपर्यंत, तसेच पोलीस या सर्वांची विधाने आहेत. ७०० लोक खोटे बोलू शकत नाहीत.’’ |