कर्नाटकातील भाजपच्या आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बहुतांश मदरशांमध्ये असे होत असल्याने सरकारने त्यांच्या विरोधात कृती करावी ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु आणि ख्रिस्ती धर्मीय मुले इतर शाळांमध्ये शिकतच आहेत; पण मदरशांमध्ये राष्ट्रविरोधी शिकवण दिली जात असल्याने राज्यातील मदरशांवर बंदी घालावी किंवा त्यांना इतर शाळांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम शिकवण्याची सक्ती करावी, अशी मागणी भाजपचे आमदार एम्.पी. रेणुकाचार्य यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांच्याकडे केली.
मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव असलेले रेणुकाचार्य पुढे म्हणाले,
१. मी काँग्रेसला विचारतो की, आपल्याला मदरशांची आवश्यकताच काय? मदरसे कोणत्या गोष्टींचे समर्थन करतात, प्रसार करतात ? ते निरागस मुलांना भडकावतात. उद्या ते आपल्या देशाच्या विरोधी जातील आणि कधीच ‘भारत माता की जय’ म्हणणार नाहीत.
२. हिजाबबंदीवरील प्रकरणावरून काही राष्ट्रविरोधी संघटनांनी ‘कर्नाटक बंद’चे आवाहन केले आहे. असा बंद पाळायला हा काय पाकिस्तान अथवा बांगलादेश अथवा अन्य कोणता इस्लामी देश आहे का ? आम्ही हे सहन करू शकत नाही. विधानसभेत काँग्रेसी नेत्यांकडून ‘कर्नाटक बंद’चा बचाव केला जात आहे.’’ (काँग्रेसचे अल्पसंख्यांकप्रेम जाणा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
‘They will never say Bharat Mata ki Jai’: Karnataka MLA says madrassas should be banned https://t.co/VEBzBfNXig
— Hindustan Times (@HindustanTimes) March 27, 2022