Menu Close

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या तथाकथित ‘शहीद दिना’च्या निमित्त मुंबई येथे काँग्रेसकडून कार्यक्रम

हिंदूंचा वंशविच्छेदक टिपू सुलतानचा कार्यक्रम वारंवार आयोजित करणार्‍या काँग्रेसवर हिंदूंनी बहिष्कार का घालू नये ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

अनधिकृतरित्या स्थापन करण्यासाठी आणलेला टिपू सुलतानचा पुतळा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधानंतर पोलिसांनी हटवला !

जे हिंदुत्ववाद्यांच्या निदर्शनास येते, ते पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही ? पोलिसांनी ही कृती स्वत:हून का केली नाही ?

Tipu-Sultanमुंबई : लक्षावधी हिंदूंना ठार करणारा, हिंदु स्त्रियांची अब्रू लुटणारा, हिंदूंची मंदिरे पाडणारा आणि हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या ‘शहीद दिना’च्या निमित्ताने मुंबई काँग्रेसच्या वतीने ४ मे या दिवशी ‘शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान योम-ए-शहादत’ आणि ‘टिपू सुलतान रोड चौक का मुजय्यन ‘ असा कार्यक्रम आयोजित केला होता. भवन्स कॉलेज, अंधेरी येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे महासचिव अलहाज मोहसिन हैदर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (आक्रमकांचे उदात्तीकरण करणारा हैदर आणि काँग्रेस हे देशद्रोहीच आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने अंधेरी येथील डी.एन्. नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांना निवेदन देण्यात आले होेते. पोलिसांना निवेदन देतांना बजरंग दलाचे ओशीवरा जिल्ह्याचे संयोजक श्री. नरेंद्र रोकडे, भाजपचे मुंबईचे सहसचिव श्री. संजय ओरपे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिषेक नाणेकर यांच्यासह बजरंग दलाचे १५ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (क्रूरकर्मा टिपू सुलतान याच्या उदात्तीकरणाला विरोध करणार्‍या हिंदुत्ववाद्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘टिपू सुलतान रोड’वर (रस्त्यावर) टिपूचा पुतळा स्थापन करण्याचा आयोजकांचा कुटील डाव होता. (हिंदूंनो, तुमच्या पूर्वजांवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्म्याचे रस्त्याला दिलेले नाव पालटण्यास शासनाला उद्युक्त करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हा पुतळा स्थापन करण्याविषयी कोणतीही अनुमती घेण्यात आलेली नव्हती. हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या विरोधानंतर पोलिसांनी हा पुतळा हटवला.

सायंकाळी ७ वाजता कार्यक्रम चालू झाला. या वेळी टिपू सुलतान चौकात टिपू सुलतान याचा पुतळा झाकून ठेवण्यात आला होता. या पुतळ्याभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (क्रूरकर्म्याच्या पुतळ्याच्या रक्षणासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणे संतापजनक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर रात्री १०.३० वाजता मुंबई महानगरपालिकेच्या गाडीद्वारे हा पुतळा हटवण्यात आला.

(म्हणे) ‘हिंदुस्थान कुणाच्या बापाची मालमत्ता नाही !’ – शेर पटेल

कार्यक्रमात भाषण करतांना शेर पटेल म्हणाले, “टिपू सुलतान याने १५६ मंदिरांना पैसे दिले होते. (टिपूने हिंदूंची असंख्य मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या, त्याविषयी पटेल का बोलत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मुसलमान हिंदुस्थानशी इमानदार होते, आहेत आणि रहातील.” देशासाठी प्राण देण्यास मुसलमान नेहमी सिद्ध होते, आहेत आणि राहतील. (वन्दे मातरम् न म्हणण्याची मानसिकता, ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणारे ओवैसी, हीच देशाप्रती इमानदारी आहे का ? ‘देशासाठी प्राण’ देण्याची भाषा करणार्‍या शेर पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या किमान दहा तरी मुसलमानांची नावे सांगावीत आणि मग मुसलमानांच्या देशप्रेमाच्या गोष्टी कराव्यात. देशासाठी प्राण देणार्‍या मुसलमानांची नावे जरी पटेल यांना सांगता आली नाहीत, तरी देशावर आक्रमण करणारा महंमद घोरी, गझनीचा महंमद, अल्लाउद्दिन खिलजी, अब्दाली, हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करणारा औरंगजेब अशा आक्रमकांच्या नावांची नोंद इतिहासात आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

नाटिकेमध्ये टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करतांना दिशाभूल करणारी माहिती !

या वेळी सादर करण्यात आलेल्या नाटिकेच्या प्रारंभी निवेदकाने माहिती सांगतांना ‘जर टिपू सुलतानच्या मनात आले असते, तर त्याने काही वेळातच सर्व हिंदूंना मुसलमान केले असते; मात्र हे टिपू सुलतान याच्या नियमांच्या विरोधात होते. म्हैसूरच्या ६० लक्ष लोकांपैकी केवळ ४ लक्ष मुसलमान होते. तरीही टिपू सुलतान सर्वांचा राजा होता. यावरून लक्षात येते की, टिपू सुलतान केवळ मुसलमानांना नव्हे, तर सर्वांना आवडत होता’, अशा प्रकारे टिपू सुलतानाविषयी खोटी माहिती दिली. (लक्षावधी हिंदूंचे छळाबळाने धर्मांतर केल्यामुळे टिपू सुलतान स्वत:ला गाझी ही उपाधी लावत होता. सहस्रो हिंदूंनी टिपूच्या भयाने तुंगभद्रा नदीत उड्या मारून जीवन संपवले. असा क्रूरकर्मा केवळ धर्मांधांचाच आवडता असू शकतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

अभ्यासक्रमात राष्ट्राविषयी स्वाभिमान जागृत करणारा खरा इतिहास शिकण्याची अपरिहार्यता दर्शवणारे पोलिसांचे वक्तव्य

हिंदुत्ववाद्यांशी बोलतांना पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे म्हणाले, “हा टिपू सुलतानऐवजी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असल्याचे तुम्ही समजा.” (उद्या कोणी दाऊदचा पुतळा बनवल्यास त्याला हा गांधींचा पुतळा समजा, असे पोलीस म्हणतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेला एक पोलीस हिंदुत्ववाद्यांशी बोलतांना म्हणाला,”टिपू सुलतान हा थोर राजा होता. इंग्रजांशी लढून त्याने देशाचे रक्षण केले.” (इतिहास माहीत नसणारे असे पोलीस देशाचे रक्षणकर्ते बनतात, हे दुर्दैवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *