Menu Close

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘सेक्युलरवाद्यांचा (निधर्मीवाद्यांचा) ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध का ?’ या विषयावर विशेष संवाद !

मुंबई – वर्ष १९९० मध्ये केंद्रात व्ही.पी. सिंग यांचे सरकार असतांना एका दिवसात काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झालेला नाही, तर त्याची सिद्धता पुष्कळ वर्षे आधीपासून चालू होती. आधी पैसा पुरवठा, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणे, शस्त्र पुरवठा केला गेला. वर्ष १९८९ मध्ये फारूक अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असतांना त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. त्या वेळी काश्मिरी हिंदूंचे नेते टिकालाल टपलू, तसेच न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांच्यासह अनेकांच्या हत्या केवळ ते ‘हिंदू’ होते म्हणून करण्यात आल्या. खरे तर जवाहलाल नेहरू आणि काँग्रेस यांनी काश्मीरमध्ये कलम ३७० (या कलमामुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा होता. आताच्या केंद्र सरकारने हे कलम रहीत केले आहे.) आणि कलम ३५ अ (जम्मू-काश्मीरच्या राज्य सरकारला स्वत:ची राज्यघटना आणि विशेष कायदे बनवण्याचे अधिकार देण्यात आले. यातील काही तरतुदी केंद्र सरकारने रहित केल्या आहेत.) लागू केल्यापासून हिंदूंच्या नरसंहाराला प्रारंभ झाला होता. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काश्मिरी विचारवंत आणि अभ्यासक श्री. ललित अंबरदार यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सेक्युलरवाद्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध का ?’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात सहभागी झाले होते. श्री. ललित अंबरदार यांना ‘काश्मिरी नरसंहाराला केवळ व्ही.पी. सिंग सरकार आणि त्यांना पाठिंबा देणारा भाजप उत्तरदायी आहे का ?’, या काँग्रेसच्या आरोपावरील प्रश्नाला उत्तर देतांना वरील वक्तव्य केले.

श्री. ललित अंबरदार पुढे म्हणाले की,

श्री. ललित अंबरदार

१. वर्ष १९९० च्या दशकात मशिदींच्या ध्वनीक्षेपकावरून हिंदूंच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या.

२. काश्मिरी मुसलमानांनी तेथील हिंदूंना वाचवले असते, तर हिंदूंना काश्मीरमधून विस्थापित होण्याची वेळ आली नसती. तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी खर्‍या अर्थाने काश्मिरी हिंदूंना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यामुळेच आज काश्मीर भारतात आहे. यामुळेच काँग्रेस, कम्युनिस्ट (साम्यवादी), लिबरल (उदारमतवादी), सेक्युलरवादी (निधर्मीवादी) हे जगमोहन यांना सतत लक्ष करून कलंकित करत आहेत; पण ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे काँग्रेस, कम्युनिस्ट, लिबरल, सेक्युलरवादी यांनी ३२ वर्षे लपवलेले सत्य जगासमोर आल्यामुळेच ते बिथरले आहेत.


हे पहा –

♦ हिन्दू जनजागृति समिति आयोजित : विशेष संवाद ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में “⭕ सेक्यूलरवादीयों कि ‘दी कश्मीर फाइल्स’ को विरोध क्यों ?”

काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा ! – ललित अंबरदार यांची मागणी

आता मोदी सरकारने ‘काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार झाला’, हे वास्तव स्वीकारून संयुक्त राष्ट्राच्या नियमाप्रमाणे त्याची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *