Menu Close

मुंबईतील अनेक ठिकाणे होत आहेत मुसलमानबहुल : अनेक उद्योग-धंद्यांमध्येही मुसलमानांचा वाढता प्रभाव !

वांद्रे रेल्वेस्थानकाच्या बाहेर अवैधपणे उभारण्यात आलेल्या बहुमजली झोपडपट्ट्या

मुंबई – जुन्या मुंबईतील मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रांट रोड आदी भागांत पूर्वी मराठी, मारवाडी, गुजराती माणसे होती. सद्यःस्थितीत मात्र या भागांत मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, मुंबई सेंट्रल, कुर्ला, खार, बांद्रा, सांताक्रूझ, अंधेरी (पश्चिम), मालाड-मालवणी, वडाळा रेल्वेस्थानक, जोगेश्वरी (पश्चिम), गोवंडी, मीरारोड, नालासोपारा, भिवंडी, मुंब्रा आदी अनेक भाग हळूहळू मुसलमानबहुल झाले आहेत. मुसलमानांची संख्या अशा प्रकारे वाढत राहिल्यास भविष्यात या भागांत होणार्‍या निवडणुकींमध्ये येथून हिंदु उमेदवार निवडून येणे अशक्यप्राय होण्याची शक्यता आहे. विविध भागांसह मुंबईतील अनेक छोटे उद्योग आणि व्यवसायही मुसलमानांच्या कह्यात गेले आहेत.

गाड्या दुरुस्त करणारे, वृत्तपत्र विक्रेते, फळविक्रेते, कुरिअर पोचवणारे, चप्पल विक्रेते, रस्त्यांवरील विविध हातगाड्या, सुर्‍यांना धार लावणारे, सुतारकाम, टॅक्सीचालक, ओला-उबर यांचे चालक, फेरीवाले आदी बहुतांश व्यवसाय आणि उद्योग यांमध्ये मुसलमानांची सख्या झपाट्याने वाढत आहे. यांतील बहुतांश उद्योग मुसलमानांच्या कह्यात गेले असल्याचे पहायला मिळते. यापूर्वी केवळ कोळीबांधव मासेविक्री करायचे; मात्र सध्या अनेक मुसलमान मासे विक्रेते आढळून येतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मुसलमान विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.

शासकीय आणि धर्मादाय रुग्णालय येथेही मुसलमान रुग्ण अधिक !

काही वर्षांपूर्वी ‘श्री सिद्धिविनायक ट्रस्ट’कडून दिल्या जाणार्‍या आर्थिक साहाय्यांतील ८० टक्क्यांहून अधिक लाभार्थी मुसलमान असल्याचे समोर आले होते. सद्यःस्थितीतही मुंबईतील के.ई.एम्., नायर आदी शासकीय रुग्णालयांसह धर्मादाय रुग्णालयांमध्येही मुसलमान लाभधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. रुग्णालयांच्या ठिकाणी बुरखाधारी महिला मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

वांद्रे रेल्वेस्थानकावरील झोपडपट्ट्यांद्वारे मुसलमानांचे अतिक्रमण !

वांद्रे रेल्वेस्थानकाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांमुळे हे रेल्वेस्थानक अक्षरश: एका बाजूने झाकोळले आहे. या ठिकाणी ४ मजली झोपडपट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. यांतील बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये मुसलमानांची वस्ती आहे.

बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात ठोस कारवाई नाही !

मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नाविषयी भाजपचे माजी आमदार राज पुरोहित यांनी आवाज उठवला होता, तसेच मनसेच्या वतीनेही ‘भारत माझा देश आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांचा नाही. त्यांना या देशातून हाकललेच पाहिजे’, असे घोषवाक्य असलेले फलक लावून ९ फेब्रुवारी २०२० या दिवशी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. खोटे दाखले सिद्ध करून मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोर वाढत असल्याचा प्रश्न काही वर्षांपूर्वी विधीमंडळातही उपस्थित करण्यात आला होता; मात्र त्यानंतरही मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात ठोस कारवाई झालेली नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *