नागपूर – भारताच्या अर्थव्यवस्थेला समान अर्थव्यवस्था ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून उभारत आहे. त्यातून प्राप्त होत असलेला निधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होऊ लागला आहे. हे प्रमाणपत्र केवळ खाद्यपदार्थांपुरते किंवा खासगी आस्थापनापुरते मर्यादित राहिले नसून औषध, सौंदर्यप्रसाधने आणि अन्य वस्तू, तसेच उपाहारगृह, रेल्वे, विमानसेवा यांमध्येही त्याने शिरकाव केला आहे. हिंदू आणि राष्ट्र यांना वाचवायचे असेल, तर राष्ट्रांतर्गत चालू झालेले ‘हलाल प्रमाणपत्रा’चे षड्यंत्र मोडून पाडावे लागेल, असे विधान हिंदु जनजागृती समितीचे श्री. विद्याधर जोशी यांनी केले. अखिल विश्व सरयूपारीण ब्राह्मण महासभा, नागपूर यांच्या वतीने २७ मार्च या दिवशी जवाहर विद्यार्थीगृह येथे ‘होली मीलन समारोह’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी पुणे येथील वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी, गोवा येथील आयुर्वेदाचार्य गोविंदराव उपाध्याय आणि नागपूर येथील साहाय्यक कामगार आयुक्त आशुतोष पांडेय यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच महासभेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्र, कार्याध्यक्ष श्री. प्रेमशंकर चौबे, महामंत्री श्री. ओमप्रकाश मिश्र, कोषाध्यक्ष श्री. अजय त्रिपाठी हेही उपस्थित होते. ब्राह्मणांना लक्ष्य करून समाजापासून दूर करण्याचे आणि त्यांना नष्ट करण्याचे षड्यंत्र धर्मांध अन् डाव्या विचारसरणीचे लोक रचत आहेत, यावर वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी अवगत केले.
प्रारंभी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक श्री. सोमनाथजी मिश्र आणि सुप्रसिद्ध भोजपुरी गीत गायिका सौ. संध्या सोमनाथजी मिश्र यांनी भावपूर्ण गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्वेता शुक्ला शेलगावकर यांनी केले. कार्यक्रमाला ब्राह्मण महासभेचे ६०० हून अधिक सदस्य उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. ब्राह्मण महासभेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
२. संस्कृतीची जोपासना आणि समाजप्रबोधन यांचे उल्लेखनीय कार्य केल्याविषयी समितीचे श्री. विद्याधर जोशी यांचा ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.