Menu Close

धर्मांध पतीकडून तिहेरी तलाक देऊन हिंदु पत्नीवर ‘हलाला’साठी दबाव !

नवरात्रीत मांस खाण्यास भाग पाडले

लव्ह जिहादच्या आणखी किती घटना घडल्यावर हिंदु महिला जाग्या होणार आहेत ? आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकार देशपातळीवर कधी कायदा करणार आहे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

भोपाळ (मध्यप्रदेश) – नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली येथील फारूख याने मला तिहेरी तलाक देऊन माझ्यावर हलालासाठी दबाव आणला, असा आरोप त्याच्या हिंदु पत्नीने केला. ‘लग्नानंतर माझ्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला गेला, तसेच नवरात्रीत मला मांस खाण्यास भाग पाडले’, असाही आरोप तिने केला.

पीडित हिंदु महिलेने ८ वर्षांपूर्वी फारूखशी प्रेमविवाह केला होता. महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्नापूर्वी फारूखने सांगितले होते की, तो तिला धर्म पालटण्यासाठी सक्ती करणार नाही; परंतु प्रत्यक्षात लग्नानंतर लगेचच फारूख आणि त्याच्या घरातील लोकांनी तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणणे चालू केले. हुंड्यासाठीही तिचा छळ  केला. २४ मार्च २०२२ या दिवशी फारूखने तिला तलाक दिला. आता तिच्यावर ‘हलाला’साठी दबाव आणला जात आहे. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती करेली पोलीस ठाण्याचे प्रमुख अखिलेश मिश्रा यांनी दिली.

काय आहे ‘हलाला’ प्रथा ?

हलाला म्हणजे पहिल्या पतीने तलाक दिल्यावर परत त्याच्याशीच विवाह करायचा असेल, तर महिलेने अन्य कुणाशी तरी विवाह करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर त्याने तलाक दिल्यावर परत पहिल्या पतीशी विवाह करण्याची प्रथा.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *