Menu Close

नागोठणे (जिल्हा रायगड) येथे शिवजयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीकडून व्याख्यान !

नागोठणे (जिल्हा रायगड) – येथील हिंदु जनजागृती मंचचे अध्यक्ष श्री. योगेश ठाकूर परिवार आणि जय हनुमान ग्रामस्थ क्रीडा मंडळ, तरशेत यांच्या वतीने (वर्ष पाचवे) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पूजन, पाळणा, आरती झाल्यानंतर ह.भ.प. नरेश महाराज जाधव यांनी ‘शिवचरित्रा’वर कीर्तन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. मिलिंद पोशे यांनी ‘हिंदूंनो, शिवचरित्रातून आध्यात्मिक शौर्यजागृतीची प्रेरणा घ्या !’ या विषयावर व्याख्यान दिले. ‘शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवरायांप्रमाणे शक्ती, भक्ती आणि युक्ती यांचा वापर करून हिंदु राष्ट्रासाठी वेळ देणे, स्वरक्षण प्रशिक्षण शिकून घेणे आणि हिंदूसंघटनासाठी अविरत प्रयत्न करणे हे काळानुसार शिवछत्रपतींचे कार्य आहे’, असे श्री. पोशे यांनी या वेळी सांगितले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमानंतर मंडळाच्या वतीने समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

२. कार्यक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

३. ‘अशा मार्गदर्शनाची सर्वांना आवश्यकता आहे’, असे अनेकांनी सांगितले.

४. अचानक वीज खंडित होऊनही सर्वांनी वीज येईपर्यंत शांतपणे वाट पाहिली. त्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्धरितीने पार पडला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *