Menu Close

हलाल मांसावर बहिष्कार घालून ‘झटका’ मांस खरेदी करणार्‍या हिंदु समाजाचे अभिनंदन – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकातील ‘होसतोडकू’ सणाला हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणार्‍या हिंदु संघटनांच्या अभियानाला यश !

बेंगळुरू (कर्नाटक) – युगादीच्या (गुढीपाडवाच्या) दुसर्‍या दिवशी असलेल्या ‘होसतोडकू’ या सणाच्या दिवशी हिंदूंच्या देवतांना मांस अर्पण केले जाते. यापूर्वी देवतांना ‘हलाल’ मांस अर्पण करत होते. हिंदु जनजागृती समितीसह अनेक हिंदु संघटनांनी युगादीच्या (गुढीपाडवाच्या) दुसर्‍या दिवशी असलेल्या ‘होसतोडकू’ या सणाच्या दिवशी हलाल मांसावर बहिष्कार घालून झटका मांस खरेदी करण्याचे आवाहन हिंदूंना केले होते. त्याप्रमाणे हिंदु समाजाने होसतोडकू सणाच्या दिवशी हलाल मांसावर बहिष्कार घालून झटका मांसाची खरेदी केल्याचे अनेक जिल्ह्यांत लक्षात आले आहे. ‘हलालच्या माध्यमातून प्राण्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात येते. असे करणे हे ‘वर्ष १९६० च्या प्राणी हिंसाविरोधी कायद्या’च्या विरोधात आहे. हिंदु समाजात प्राण्यांची इतक्या अमानुषतेने हत्या करणे निषेधार्ह आहे. आमच्या मागणीला प्रतिसाद देऊन हलाल मांसावर बहिष्कार घालणार्‍या हिंदु समाजाचे अभिनंदन ! अशाच रीतीने पुढेही अन्य हलाल उत्पादनांवर आपण बहिष्कार घालूया’, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे. यापुढे राज्य सरकारने हलालच्या नावाखाली चालणारी अमानुषता रोखण्यासाठी प्राण्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्याचा नियम कठोरपणे लागू करण्यात यावा, अशी मागणीही समितीने केली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *