Menu Close

घाटकोपर (मुंबई) येथे पोलिसांनी ध्वनीवर्धक जप्त करून मनसेच्या विभागप्रमुखांना घेतले कह्यात !

मशिदींवरील भोंग्यांना प्रत्युत्तर म्हणून भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आवाहन !

  • मशिदींवरील अवैध भोंगे काढण्याचे धाडस कोणतेही सरकार करत नाही, हे लक्षात घ्या !
  • मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न करणारे पोलीस हिंदूंनी लावलेल्या ध्वनीवर्धकांवर मात्र तत्परतेने कारवाई करतात. हिंदू बहुसंख्य असूनही त्यांच्यावर कारवाई करणारे पोलीस अल्पसंख्यांकांच्या विरोधात कारवाई करायला का कचरतात ? यालाच सर्वधर्मसमभाव म्हणतात का ? असा दुजाभाव करणाऱ्या पोलिसांना हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारावा !
भानुशाली यांना कह्यात घेवून जातांना पोलिस

सकाळी आणि सायंकाळी ‘हनुमान चालिसा’ लावणार म्हणजे लावणार ! – महेंद्र भानुशाली, मनसे

सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन मी करत आहे. त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून मी येथील मनसेच्या शाखेवर ध्वनीवर्धक लावून हनुमान चालिसा लावली आहे. मी माझ्या धर्मानुसार आरती करत आहे. पोलीस आणि प्रशासन यांनी मला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तरीही सकाळ आणि सायंकाळी प्रत्येकी २ घंटे मी हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच. (अनेकदा तक्रारी करूनही पोलीस मशिदींवरील भोंगे हटवत नाहीत आणि त्यांवर कारवाईही करत नाहीत. त्यामुळे हिंदूंना नाईलाजाने ही कृती करावी लागत आहे ! – संपादक)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *