- फेरी मुसलमानबहुल भागातून जात असतांना आक्रमण
- ४ पोलिसांसह ३५ जण घायाळ
- शहरात संचारबंदी लागू
- इंटरनेट सेवाही बंद
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे हिंदू असुरक्षितच असणार, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट होते !
अन्य धर्मियांच्या धार्मिक मिरवणुकांवर कधी हिंदुबहुल भागांत आक्रमण झाल्याची घटना घडल्याचे ऐकले आहे का ? मात्र हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मुसलमानबहुल भागांतून गेल्यावर त्यांच्यावर आक्रमण झाल्याच्या घटना प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात घडतात आणि निधर्मी त्यावर मौन बाळगतात !
करौली (राजस्थान) – गुढीपाडव्याच्या दिवशी येथे हिंदूंकडून काढण्यात आलेली दुचाकी फेरी मुसलमानबहुल भागातून जात असतांना तिच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. मोहन मंदिर भागातील १२ हून अधिक दुकानांना आगी लावण्यात आल्या. ३ वाहने जाळण्यात आली. यात ३५ जण घायाळ झाले. यात ४ पोलीस कर्मचार्यांचाही समावेश आहे. घायाळांपैकी पुष्पेंद्र नावाच्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले. या हिंसाचारानंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
#Karauli communal clashes: Police form SIT to probe violence, curfew continues #Rajasthan #karauliriot #AshokGehlot #BJP #Congress https://t.co/5O33mgr1Qb
— India TV (@indiatvnews) April 3, 2022
सध्या येणे तणावपूर्ण वातावरण आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी येथे ध्वजसंचलनही केले. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ‘दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले आहे. यासह ‘लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे’, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३६ जणांना अटक करण्यात आली आहे.