Menu Close

अलीगढ मुस्लिम विद्यापिठातील हिंदु प्राध्यापकानेच केले देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन !

हिंदु धर्माचे खरे वैरी हे हिंदूच !

विद्यापिठाने केले निलंबन !

  • एका इस्लामी विद्यापिठात जर हिंदु प्राध्यापकच त्याच्या श्रद्धास्थानांचा अनादर करत असेल, तर अन्य धर्मीय हिंदु धर्माचा आदर करतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावापायीच असे प्रकार घडतांना दिसतात. त्याविरोधात हिंदू मात्र मूग गिळून गप्प बसतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अलीगढ मुस्लिम विद्यापिठाचे (‘ए.एम्.यू.’चे) साहाय्यक प्राध्यापक डॉ. जीतेंद्र कुमार यांनी धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. ‘डॉ. कुमार यांनी ‘फॉरेन्सिक औषध विभागा’च्या वर्गात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना संबोधित करत असतांना हिंदु पुराणकथांतील दाखले देत देवतांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्याकडून यासंदर्भात लेखी खुलासा मागवला असून तोपर्यंत त्यांना निलंबित केले आहे’, असे विद्यापिठाचे जनसंपर्क प्रमुख शफी किडवाई यांनी सांगितले. विद्यापिठाचे कुलगुरु तारिक मन्सूर यांनीही या घटनेचा निषेध केला. डॉ. कुमार यांनी विनाशर्त क्षमायाचना केल्याचे समजते.

किडवाई म्हणाले की, या व्याख्यानात डॉ. कुमार यांनी केलेल्या विडंबनाची माहिती विद्यार्थ्यांनी सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केली. विद्यापिठाने या प्रकाराची गंभीर नोंद घेतली असून निलंबनानंतरच्या पुढील कारवाईचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

डॉ. कुमार यांनी देवतांच्या विरोधात केलेली आक्षेपार्ह वक्तव्ये !

‘ब्रह्मदेवाने त्यांच्या मुलीवर बलात्कार केला होता. तसेच इंद्रदेवाने ऋषि गौतम यांचे रूप धारण करून त्यांच्या पत्नीवर बलात्कार केला होता. भगवान विष्णूने राजा जालंधरच्या पत्नीवर बलात्कार केला !’ (धर्मशास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे अशी वक्तव्ये करणारे हिंदु प्राध्यापक ! अलीगढ मुस्लिम विद्यापिठात असे वक्तव्य जर इस्लामच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात कुणी केले असते, तर विद्यापिठाकडून निलंबन नाही, तर त्या प्राध्यापकाला थेट घरीच बसवण्यात आले असते. प्राध्यापकाच्या विरोधात फतवे निघाले असते. विद्यापिठातील धर्मांध विद्यार्थ्यांकडून अनादर करणार्‍या प्राध्यापकाच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकला असता, असेही कुणी म्हटल्यास वावगे वाटण्याचे कारण नसावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *