Menu Close

केवळ शारीरिक, मानसिक नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम स्त्रीच खरी रणरागिणी ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर

pratiksha_korgavkar

मुंबई : निर्भया प्रकरण झाल्यावर अनेक ठिकाणी मेणबत्ती मोर्चे काढण्यात आले. त्यातून केवळ भावना व्यक्त करता येते. त्यामुळे महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत. ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले, तरच त्यांच्यावरील अत्याचार रोखता येतील. यासाठी प्रत्येक स्त्रीने रणरागिणी होणे आवश्यक आहे. केवळ शारीरिक, मानसिक नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम स्त्रीच खरी रणरागिणी होय, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. चुनाभट्टी येथील आगरी समाज विकास संघाच्या महिलांना महिलांचे सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, निर्भया, शक्ती मिल यांसारखी वारेमाप प्रकरणे घडत आहेत. प्रती ३४ व्या मिनिटाला बलात्कार होतात. कुणी हात मारून जातो, कुणी विनयभंग करतो, असे प्रकार रोखण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यायला हवे. आज लव्ह जिहादच्या घटना वाढल्या आहेत. मुसलमान युवक हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहेत. याविषयी रणरागिणी शाखा महिलांचे प्रबोधन करत आहे. महिलांवर अत्याचार होऊ नयेत, यासाठी रणरागिणी शाखा कार्यरत आहे.

महिलांनी दिलेले अभिप्राय

१. काही महिला – या व्याख्यानामुळे आमच्या जीवनात आनंददायी वातावरण निर्माण झाले असून आम्हाला जगण्यासाठी बळ मिळाले.

२. साधना देशपांडे – रणरागिणी शाखा अत्यंत चांगले कार्य करत आहे. स्त्रियांना कराटे, ज्युडो असे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण किती आवश्यक आहे, याची जाणीव झाली. रणरागिणी शाखा महिलांसाठी करत असलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.

३. आशा मढवी – या कार्यक्रमामुळे आमच्या विचारांना जागृती मिळाली. येणार्‍या संकटांना सामोरे जाण्याचे बळही मिळाले.

४. राणी येरूणकर, भरारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा – कार्यक्रम पद्धतशीर वाटला. आनंद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

13 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *