खंडोबा गडावरील त्रिकाल पूजेव्यतिरिक्त अन्य पूजा बंद करण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या फतव्याचे तीव्र पडसाद
धर्मादाय सहआयुक्तांनी हिंदूंच्या प्रथा-परंपरावर बंदी घालण्याचा तुघलकी निर्णय घेण्यापूर्वी शंकराचार्य किंवा धर्माचार्य यांची अनुमती घेतली होती का ? आज पूजा बंद करणारे प्रशासन उद्या हिंदूंना मंदिरातही प्रवेश करण्यास बंदी करील ! भाजपच्या राज्यात असा निर्णय हिंदूंना अपेक्षित नाही !
पुणे : स्वयंभू शिवलिंगावर सततचा होणारा जलाभिषेक, तसेच पूजा यांमुळे शिवलिंगाची झीज होण्याचा संभव असल्याचे सांगत जेजुरीच्या खंडोबा गडावरील मुख्य मंदिराच्या गाभार्यातील स्वयंभू लिंगावर त्रिकाल पूजेव्यतिरिक्त होणार्या अन्य पूजा करण्यास बंदी घालणारे निर्देश धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले होते. या निर्णयाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ६ मे या दिवशी कडकडीत बंद पाळला. या वेळी सकाळी ग्रामस्थांनी गावात निषेध मोर्चाही काढला, तसेच निषेध सभाही घेतली. पुजारीवर्गानेही मंदिरात न जाता देवाची पूजा, अभिषेक, तळी, जागरण आदी धार्मिक विधी बंद करून निषेध नोंदवला. हा निर्णय रहित होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थ आणि पुजारी यांनी व्यक्त केला आहे.(देवस्थानांच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतांना अध्यात्म आणि धर्म या विषयातील अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. तसे न करता भाविकांना देवापासून दूर लोटणारे निर्णय घेऊन प्रशासकीय अधिकारी काय साध्य करू पहात आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. राज्यभरात प्रतिदिन सहस्रो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येत असतात, तसेच त्या ठिकाणी श्रद्धेने पूजा आणि अभिषेक करतात.
२. त्रिकाल पूजेव्यतिरिक्तच्या पूजा बंद करण्याचा निर्णय हा देवस्थानच्या विश्वस्तांच्या मनमानी कारभाराचा, तसेच हुकूमशाहीचा प्रकार आहे, अशा तीव्र शब्दांत ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात