Menu Close

पिसोळी (पुणे) येथील ‘सांकला विस्टाज्’ गृहसंकुलातील श्री गणेशमूर्ती पोलिसांच्या साहाय्याने धर्मांधांनी हटवली !

पुणे – पिसोळी येथील ‘सांकला विस्टाज्’ या गृहसंकुलामधील (सोसायटी) ‘क्लबहाऊस’मध्ये असलेली श्री गणेशमूर्ती मागील आठवड्यात कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी हटवली आणि ती घेऊन गेले. मूर्ती घेऊन जातांना तिची आरतीही करू दिली नाही, ती अयोग्य पद्धतीने हाताळली आणि त्या वेळी पोलिसांनी बूटही घातले होते. त्यामुळे एकप्रकारे मूर्तीची विटंबनाच झाली. या घटनेनंतर पहाटे ५ वाजता त्या गृहसंकुलात काही जणांनी फटाके फोडले. या घटनेनंतर रहिवासी अजीजा शेख यांच्या तक्रारीवरून उलट ९ हिंदु रहिवाशांवरच गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गफूर पठाण हे या परिसराचे नगरसेवक आहेत. त्यांचा पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

या संदर्भात येथील हिंदु रहिवाशांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे

१. ‘सांकला विस्टाज्’ या गृहसंकुलात एकूण १२८ ‘फ्लॅट’ असून त्यांपैकी २४ फ्लॅट मुसलमानांचे आहेत. म्हणजे तिथे ८० टक्के हिंदु, तर २० टक्के मुसलमान रहातात.

२. गृहसंकुलामध्ये वर्ष २०१५ पासून येथील ‘क्लबहाऊस’मध्ये श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तेव्हापासून येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. सप्टेंबर २०२१ मध्ये गृहसंकुलातील रहिवाशांनी श्री गणेशाचे मंदिर उभे करायचे ठरवले होते. त्यासाठी नियोजित जागेचे भूमीपूजन करून गृहसंकुलाची रीतसर अनुमतीही घेतली होती.

३. दळणवळण बंदीच्या काळात गृहसंकुलातील धर्मांध रहिवाशांनी नमाज पढण्यासाठी ‘क्लब हाऊस’चा वापर करण्याविषयी अन्य रहिवाशांना विचारले. त्या वेळी त्यांना हिंदु रहिवाशांनी तशी अनुमती दिली. त्यानंतर ‘क्लबहाऊस’मध्ये नमाजपठण होऊ लागले. (हिंदूंनो, धर्मांधांना नमाज पढण्यासाठी जागा दिल्यावर ते त्यावर कशा प्रकारे अधिकार सांगू लागतात, हे लक्षात घ्या आणि त्यांना अनुमती द्यायची का ते ठरवा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

४. सप्टेंबर २०२१ च्या गणेशोत्सवानंतर ‘क्लबहाऊस’मध्ये श्री गणेशमूर्ती असल्याने नमाज पढायला अडचण निर्माण होत आहे, अशी तक्रार काही मुसलमान रहिवाशांनी केली. (धर्मांधांचा कांगावा ! ‘क्लबहाऊस’ ही सार्वजनिक वास्तू असल्याचे सांगून धर्मांध श्री गणेशमूर्ती हटवायला पोलिसांना भाग पडतात; परंतु त्याच ‘क्लबहाऊस’मध्ये नमाज पढलेले कसे चालते ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

५. तेव्हापासून ‘क्लबहाऊस’मधील श्री गणेशमूर्ती कशी हटवली जाईल, या संदर्भात धर्मांधांनी विविध तक्रारी केल्या. अखेर पोलिसांनी ‘क्लबहाऊस’मधील श्री गणेशमूर्ती हटवली. (आज श्री गणेशमूर्ती हटवली गेली. उद्या ‘क्लबहाऊस’चे मशिदीत रूपांतर झाले आणि संपूर्ण वसाहतीतील घराघरांत होणारी पूजाही बंद करावी लागली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

६. अजीजा शेख यांच्या खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी हिंदु रहिवाशांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. त्यामुळे रहिवाशांना पुष्कळ मानसिक त्रास झाला.

७. पोलिसांनी कोणतीही खातरजमा न करता ‘राष्ट्रीय एकात्मतेला धोका’ आणि ‘शांती भंग करणे’ (कलम १५३ अ आणि १५३ ब) या कलमांखाली तद्दन खोटे गुन्हे नोंद केल्याचे हिंदु रहिवाशांचे म्हणणे आहे.

८. धर्मांधांनी केलेल्या तक्रारीत ‘धार्मिक कार्यक्रमाला प्रतिबंध केला’, असे म्हणून हिंदूंच्या फेरीची छायाचित्रे जोडली आहेत. त्यामुळे ही तक्रार नेमकी कशासंदर्भात आहे, तेही कळत नाही. पोलिसांनी अद्याप तक्रारीची प्रत रहिवाशांना दिलेली नाही.

९. पोलीस रहिवाशांना त्यांच्याविरोधात कशाविषयी तक्रार केली किंवा गुन्हे नोंद केले आहेत, हे सांगत नसल्याने याविरोधात रहिवाशांनी माहिती अधिकाराचा उपयोग करत जनमाहिती अधिकाऱ्याकडे आवेदन दिले. त्यावर जनमाहिती अधिकाऱ्याने ‘माहिती पुरवता येत नाही’ असे लेखी कळवले.

१०. त्यानंतर हिंदु रहिवाशांनी हे प्रकरण माहिती अधिकाराच्या वर असणाऱ्या ‘प्रथम अपिला’साठी नेले आहे. त्याची सुनावणी अद्याप झालेली नाही.

११. हिंदु रहिवाशांनी गृहसंकुलातील वातावरण बिघडवण्यात तक्रार करणारी व्यक्तीच उत्तरदायी असल्याचे पोलिसांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. (हिंदूंनो, मुंबईतील मालवणी किंवा तत्सम परिसरांप्रमाणे येथील हिंदूंची संख्या अल्प होऊन धर्मांधांची संख्या वाढली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

१२. एवढे होऊनही येथील हिंदु महिला रहिवासी तेथे मंदिर बांधण्यावर ठाम आहेत. (‘धर्मो रक्षति रक्षितः ।’ अर्थात् धर्माचे रक्षण केल्यास धर्माच्या रक्षणकर्त्याचे धर्म रक्षण करतो ! या उक्तीप्रमाणे धर्माच्या बाजूने संघटितपणे उभे रहाणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

पोलिसांकडून मूर्तीची विटंबना आणि रहिवाशांना धमकी अन् गैरवर्तन !

अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्यास कचरणाऱ्या हिंदु पोलिसांना श्री गणेशमूर्ती उखडण्यास आणि तिची विटंबना करण्यास काहीच वाटत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

१. श्री गणेशाची मूर्ती हटवण्यासाठी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पूर्ण बस भरून पोलीस येथे आले होते. पोलिसांनी केवळ मूर्ती हटवली नव्हे, तर पोलिसांनी अक्षरशः श्री गणेशमूर्तीची विटंबनाही केली.

२. पोलिसांनी कुणालाही व्हिडिओ किंवा छायाचित्र काढून दिले नाही. ‘सरकारी कामात अडथळा आणला; म्हणून गुन्हे नोंद करण्यात येतील’, अशी धमकी पोलिसांनी दिली. ज्यांनी व्हिडिओ आणि छायाचित्रे काढली त्यांचे भ्रमणभाष पोलिसांनी काढून घेतले आणि त्यातील व्हिडिओ नष्ट केले.

३. तेथे उपस्थित असलेल्या ७० वर्षे वयाच्या वृद्ध गृहस्थांशी पोलिसांनी अरेरावीचे वर्तन केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *