Menu Close

राजस्थानमध्ये हिंदूंच्या धार्मिक सणांच्या पूर्वीच काही जिल्ह्यांमध्ये भोंगे आणि धार्मिक झेंडे यांच्या वापरावर बंदी !

कोटा, बिकानेर, जोधपूर आणि अजमेर येथे कलम १४४ लागू !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या सणांच्या वेळी विविध प्रतिबंध लावले जातात; मात्र असे प्रतिबंध मोहर्रमच्या काळात कधी लावले जात नाहीत, हे लक्षात घ्या !

अजमेर (राजस्थान) – रास्थानमधील कोटा, बिकानेर, जोधपूर या जिल्ह्यांनंतर आता अजमेर येथेही कलम १४४ (जमावबंदी) लावण्यात आले आहे. ७ एप्रिलपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. या काळात भोंग्यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की, ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशानुसार कोणतीही व्यक्ती अथवा संघटना यांनी कोणत्याही धार्मिक समारोहामध्ये ‘डिजे’चा (मोठी संगीत यंत्रणा) वापर करण्यापूर्वी प्रशासनाकडून अनुमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच धार्मिक प्रतिके किंवा झेंडे यांच्या वापरावरही, तसेच विनाअनुमती खासगी जागेतही धार्मिक झेंडा लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, अशामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसह सामाजिक सद्भावावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या आदेशांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईही करण्यात येणार आहे.

भाजपकडून टीका

अजमेर शहराचे उपमहापौर आणि भाजपचे नेते नीरज जैन यांनी, ‘महावीर जयंती, दुर्गा अष्टमी, आंबेडकर जयंती, श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्यावेळी काढण्यात येणार्‍या मिरवणुकांसाठीच हा आदेश देण्यात आला आहे’, असा आरोप केला आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *