Menu Close

नागपूर येथील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा, अन्यथा आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करू !

पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे मनसेची चेतावणी !

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (उजवीकडे) यांना निवेदन देतांना मनसेचे कार्यकर्ते

नागपूर – शहरातील सर्व मशिदींवरील अनधिकृतपणे लावण्यात आलेले भोंगे तात्काळ हटवण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ७ एप्रिल या दिवशी दिले. निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यास आम्हीही भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करू, अशी चेतावणी मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी दिली आहे.

निवेदनात हेमंत गडकरी म्हणाले, ‘‘नागपूर शहरातील अनेक मशिदींवर पोलिसांची कोणतीही अनुमती न घेता भोंगे बसवण्यात आले आहेत. तेथे दिवसातून ४-५ वेळा अजान होत असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. त्याचा रुग्ण, वयोवृद्ध आणि लहान मुले यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *