करौली (राजस्थान) येथे नववर्षाच्या दिवशी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणाचा परिणाम !
|
करौली (राजस्थान) – येथे नववर्षानिमित्त हिंदूंनी काढलेल्या दुचाकी फेरीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आल्यानंतर हिंसाचार झाला होता. येथे अनेक हिंदूंची दुकाने जाळण्यात आली होती. आता या हिंदु दुकानदारांनी त्यांच्या दुकानांबाहेर ‘ही संपत्ती विकणे आहे’, असे फलक लावले आहेत. धर्मांधांच्या आक्रमणामुळे हे हिंदू दहशतीखाली आहेत. संपत्ती विकून येऊन पलायन करण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
१. एका दुकानदाराने म्हटले की, या जाळपोळीमध्ये आमची मोठी हानी झाली आहे. आमच्यावर कर्जही आहे. हेही संपत्ती विकण्यामागे कारण आहे. दहशतीखाली आम्ही जगू शकत नाही. हे लोक (धर्मांध) पुढे आमच्यासमवेत आणखी वाईट करू शकतात.
२. चंद्रशेखर गर्ग यांनी सांगितले की, आमचे ६० वर्षे जुने दुकान आहे. तरीही आम्ही ते विकण्यास सिद्ध झालो आहोत. आम्ही नेहमीच बंधूभाव ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र आम्हाला कुठे ठाऊक होते की, ते (धर्मांध) अशा प्रकारे विश्वासघात करतील !